घरमुंबईपोलिसांच्या वाहनांची फुकटात धुलाई !

पोलिसांच्या वाहनांची फुकटात धुलाई !

Subscribe

मुकुंद लांडगे – पोलिस सर्विस सेंटरमधून वाहने फुकट धुवून घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाण्यांतील हजारो वाहनांचे सर्व्हिसिंग करण्यासाठी नागपाडा येथे एकमेव अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. त्यातून सर्वच वाहनांची धुलाई करणे अशक्य असल्याचा फायदा घेत बहुतांश पोलीस ठाण्यातले पोलीस आपली वाहने बिनदिक्कत खाजगी सर्व्हिस सेंटरमधून फुकटात धुलाई करून घेतात. पोलिसांच्या वाहनांची धुलाई टाळणे खाजगी सर्व्हिस सेंटरना विविध कारणांमुळे शक्य होत नाही.

फुकट गाड्या धुण्यास मनाई का करत नाहीत?

- Advertisement -

पोलिसांच्या गाड्या धुणे टाळल्यास या सर्व्हिस सेंटरना कारवाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांना निमूटपणे पोलीस वाहनांची फुकटात धुलाई करून द्यावी लागते. मुंबई शहरातील जवळपास ९३ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका पोलीस ठाण्यातील वाहनांची संख्या बाईकसह आठ ते दहा इतकी आहे. यात चारचाकी वाहनांची संख्या जवळपास पाच ते सात इतकी आहे. या वाहनांची धुलाई करण्यासाठी पोलिसांकडे स्वत:ची अशी यंत्रणा नाही. नागपाडा येथील सेंट्रल सर्व्हिस सेंटर वगळता ताडदेव, वरळी, सांताक्रूझ, मरोळ आणि घाटकोपर उप विभागात आहेत. या सर्व्हिस सेंटरमध्ये इतक्या मोठ्या संख्येतील वाहनांची सर्व्हिसिंग करणे शक्य होत नाही. या सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि तेथील यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे वाहनांची दुरुस्तीही वेळेत होत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस वाहनांचे सर्व्हिसिंग करणे कठीण होऊन बसते.

का लढवली जाते फुकटेगिरीची शक्कल?

- Advertisement -

पोलीस ठाण्यांतील वाहनांची धुलाई करण्यासाठी त्या त्या सेंटर्समध्ये जावे लागत असते. मात्र तेथे तासनतास ताटकळत बसावे लागत असल्याने पोलिसांनी ही फुकटेगिरीची शक्कल लढवल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात वाहनांच्या धुलाईसाठी सध्या केवळ ४३ टक्के धुलाई कामगार उपलब्ध आहेत. ५७ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रकार होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये वाहनांची धुलाई होत नसल्याने ठाण्यातले पोलीस खाजगी सर्व्हिस सेंटरचा वापर करतात. तेथून फुकटात धुलाई करून घेतात. या धुलाईचा मोबदला सर्व्हिस सेंटरच्या चालकाला दिला जात नाही. येनकेन प्रकारे कारवाई नको म्हणून सर्व्हिस सेंटर चालक पोलीस वाहनांची फुकटात धुलाई करून देतात. याबाबत एका सर्व्हिस सेंटर चालकाकडे विचारणा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाचा त्याने पाढा वाचला. सर्व्हिस सेंटरला वापरल्या जाणाऱ्या पाण्यापासून ते धुलाई निमित्त पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यापर्यंत, असा विविध प्रकरचा दंड लावतात. कारवाईला सामोरे जाण्याऐवजी पोलिसांच्या वाहनांची धुलाई करून देणे त्यातल्या त्यात सोयीचे पडते, असे सर्व्हिस सेंटर चालकाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -