मुंबईकरांसाठी खुशखबर! कोरोनावरील लस देणार मोफत

पण मुंबईकरांना लसीसाठी एप्रिलपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

COVID-19 vaccine for children: Moderna begins testing on children between 6 months to 12 years old
१२ वर्षाखालील लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक लस मुंबईत दाखल झाल्यावर सर्वप्रथम कोरोना योद्धा डॉक्टर, नर्स, कामगार, पोलीस यांना ही लस देण्यात येणार आहे. समस्त मुंबईकरांनाही ही कोरोनावरील लस मोफत देण्यात येणार आहे. डब्ल्यूएचओ आणि भारतीय लसीकरणबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनावरील लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोनावरील लसीच्या साठ्याची साठवणूक ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यापैकी एक असलेल्या कांजूरमार्ग येथील परिवार संकुलाच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी उप महापौर सुहास वाडकर यांच्या भेट देऊन पाहणी केली. यावेळी, पालिका आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, माजी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे, साहाय्यक आयुक्त विभास आचरेकर , डॉ. अविनाश अंकुश, डॉ.शिला जगताप , सहाय्यक आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन विभागात कोरोनावरील लसीची साठवणूक

मुंबईत कोरोनाला रोखणारी लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र ही लस मुंबईत आल्यानंतर तिची साठवणूक करण्यासाठी शहर भागात एफ/ दक्षिण भागात, पश्चिम उपनगरात गोरेगाव येथे आणि पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथील पालिका परिवार संकुल येथील आरोग्य केंद्रात निर्माण करण्यात येणार आहे.

कांजूरमार्ग साठवणूक केंद्र होणार मध्यवर्ती

कांजूरमार्ग येथे पालिकेच्या ६ मजली इमारतीतील तीन मजले हे आरोग्य सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर ५ हजार चौ. फूट जागेत लस साठवणूक केंद्राची म्हणजे कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात या ठिकाणी कोरोनावरील लस साठवणूक करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्चपर्यंत लस साठवणूक केंद्र कार्यान्वित करण्याचा विचार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

१.२० कोटी लसीचे डोस ठेवण्याची क्षमता

कांजूरमार्ग येथील प्रस्तावित लस साठवणूक केंद्रात + २℃ ते + ८℃ तापमानात लस साठवून ठेवण्यात येणार आहे. ४० क्यूबिक मीटरचे २ उपकरणे बसविण्यात येणार आहेत. तसेच, एक -१५℃ ते -२५℃ तापमान राखत असलेले एक २० क्यूबिक मिटरचे एक उपकरण (वॉक इन फ्रीज) बसविण्यात येणार आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये कोरोनावरील १.२० लाख डोस लसीचा आवश्यक साठा ठेवण्याची व्यवस्था असणार आहे, अशी माहितीही डॉ. शीला जगताप, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी दिली.


हेही वाचा – महाबळेश्वरपेक्षाही मुंबई Cool, थंडीचा पारा घसरला