Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उद्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरून धावणार लोकल...   

उद्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरून धावणार लोकल…   

सोमवारपासून लोक ठाणे - वाशी - ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या धावणार आहेत.

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सोमवारपासून मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावरून  लोकल सेवा सुरु होणार आहे . ठाणे – वाशी – ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

लोकल सेवेची संख्या आता ३५२ वर  

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल सुरु झाली होती. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल प्रवास सुरु झालेली नव्हती. त्यामुळे या मार्गावरिल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करताना खूप समस्यांना समोर जावे लागत होते. मात्र सोमवारपासून ट्रान्स हार्बर मार्गावरून दोन  लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या  राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी  यांच्यासाठी मुंबई विभागातील मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर सध्या ३५० निवडक उपनगरी सेवा चालविण्यात येत आहेत. सोमावरपासून आणखी दोन सेवा ठाणे – वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येतील.या सेवा फक्त राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असतील. अशाप्रकारे  निवडक उपनगरी लोकल सेवेची संख्या आता ३५२  होणार आहेत. या दोन लोकल सेवा  ठाणे येथून सकाळी वाशीला जाणारी विशेष लोकल असेल. तर, ठाण्याकरिता विशेष लोकल वाशी येथून संध्याकाळी सुटेल. या विशेष लोकलला रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबतील.

प्रवाशांना रेल्वेचे आवाहन

राज्य शासनाने निश्चित केलेल्या  फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना या निवडक उपनगरी सेवांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतरांनी स्टेशनवर गर्दी करू नये अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. या सेवा सामान्य प्रवाशांसाठी नाहीत. कोविड-१९ साठीच्या निर्देशित केलेल्या  सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे.
- Advertisement -