घरमुंबईमाय लॉर्ड! चूकभूल द्यावी घ्यावी; 'सामना' अग्रलेखातून मांडले मंदिराचे अर्थकारण

माय लॉर्ड! चूकभूल द्यावी घ्यावी; ‘सामना’ अग्रलेखातून मांडले मंदिराचे अर्थकारण

Subscribe

कोरोना संकटाच्या काळात देश हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत अनेक उद्योग, व्यापार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यात अजूनही मंदिरे उघण्यास परवानगी नाही. यावरून राज्यातील काही पक्षाच्या नेत्यांनी सरकारला मंदिरे उघडण्याची विनंती केली असून अद्याप ठाकरे सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारला फटकारले असून त्यांनी पर्युषण काळात मर्यादित मंदिरे उघडण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या मुद्द्यावरून आजच्या सामना अग्रलेखात यामागील अर्थकारण उलगडण्यात आले असून त्यांनी मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, असे म्हटले आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे –

  • देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल व त्यात काय चुकले? आम्ही स्वतः मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत.
  • मंदिराचेही एक अर्थकारण असतेच व त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत व मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे.
  • कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे.
  • पर्युषण काळात मंदिरे उघडण्याची परवानगी जैन धर्म बांधवांना दिली. ही परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. कोरोनाचे संकट मोठे आहे म्हणून सरकारला कठोर पावले उचलावी लागली.
  • कोरोनाची भीती नसती तर कोर्टाने व्हर्च्युअल पद्धतीने चालवली नसती. कोरोनाच्या भयाने सुप्रीम कोर्टाचे कामकाजही नेहमीच्या खुल्या पद्धतीने चाललेले नाही.
  • मात्र त्याच कोर्टाला असे वाटते की, सरकारने इतर सर्व बंधने शिथिल करावीत. पर्युषण काळात मुंबईतील तीन मंदिरे उघडण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली हे बरेच झाले.
  • पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दोन दिवसांत ही तीन जैन मंदिरे उघडली जातील. यावेळी १२ ते ६५ वरयोगटातील पाच नागरिकांना एका वेळी प्रवेश मिळेल व दिवसभरात फक्त २५० भाविकानांच प्रवेश मिळेल असे ठरले आहे.
  • दिवसभरात फक्त २५० म्हणजे तीन मंदिरात ७५०. म्हणजे सर्व मिळून भाविकांची गोळाबेरीज २५०० होत नाही. मुंबई-ठाण्यातील जैन बांधवांची लोकसंख्या पाहता २५०० भाविकांचीच निवड कशी करावी कोर्टाने म्हणे यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे.

हेही वाचा –

Coronavirus: लहान मुलांनी मास्क घालण्याबाबत WHO ची नवीन Guidline

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -