मुंबईत पुन्हा २८ ते ३० मार्च रोजी जी-२० परिषद

मुंबईत काही दिवसांपूर्वीच जी - २० परिषदेची बैठक पार पडली. त्यासाठी मुंबईला सूसज्जीत करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मुंबईत २८ ते ३० मार्च या कालावधीत 'जी - २० परिषद' होऊ घातली आहे.

India G20

मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वीच जी – २० परिषदेची बैठक पार पडली. त्यासाठी मुंबईला सूसज्जीत करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मुंबईत २८ ते ३० मार्च या कालावधीत ‘जी – २० परिषद’ होऊ घातली आहे. त्याकरिता पुन्हा एकदा मुंबई शहर व मुंबई महापालिका सुसज्जीत होणार आहे. (G-20 summit again on March 28-30 in Mumbai)

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, रविवारी दुरदृश्य प्रणालीद्वारे ‘जी – २०’ परिषदेबाबत आढावा बैठक घेतली. जी – २० परिषदेसाठी देशविदेशातील पाहुणे मंडळी सहभागी होणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिका उद्यान खात्याकडून सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. रस्ते खड्डेमुक्त करणे, रस्ते पुनरपृष्ठीकरण, रंगरंगोटी आदी कामे करण्यात येणार आहेत.

याआधी डिसेंबर २०२२ मध्ये जी – २० परिषद पार पडली होती. जी – २० साठी येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत २८ ते ३० मार्च या कालावधीत ‘जी – २० परिषद’ होऊ घातली असल्याने पुन्हा एकदा सर्व प्रकारे पूर्व तयारी करण्यात येणार आहे.

पाहुण्यांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी, याबाबत पालिका आयुक्त चहल यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या. विशेष म्हणजे या सर्व कामांची पाहणी आणि रंगीत तालीम २५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिका निवडणूक घेतली जात नाही कारण, आदित्य ठाकरे म्हणाले…