त्यांच्यात कादरखान घुसलाय – गजानन काळे

Gajanan Kale criticizes Sanjay Raut
Gajanan Kale criticizes Sanjay Raut

संजय राऊत रोज होणाऱ्या पत्रकार परिषदेतून भाजपवर आणि मनसेवर हल्ला चढवत आहेत. हिंदुत्वावर सर्वात जास्त अधिकार हा शिवसेनेचा आहे. हिदुत्वासाठी सर्वांत जास्त त्याग हा शिवसेनेचा आहे. आजकाल हिंदुत्वावर बोलणारे राज ठाकरे हे भाजपचे नव ओवैसी आहेत. अशी टीका सतत संजय राऊत करत आहेत. याला मनसे नेते गजानन काळे यांनी उत्तर दिले आहे.

शिवसेना आमदार रमेश लटकेंना मनसेने वाहली श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी बोलताना गजानन काळे म्हणाले, आज एवढे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सामनावीर संजय राऊत यांनी आज बोलणे टाळले असते तर चांगले झाले असते. मात्र, त्यांच्यात कादरखान घुसलाय त्याला काय करणार. राऊतांनी स्वतःचे बॅाडीगार्ड बाजुला ठेवावे. त्यांनी सुरक्षेवर बोलू नये. कादर खानला सिनेमात जसे लोकं कंटाळून टमाटर मारतात, तसे आपल्या पक्षात काय सुरु आहे त्याचा त्यांनी कानोसा घ्यावा, राऊत हा रोजचा तमाशा बंद करा लोकं कंटाळली आहेत, अशी खरपूस टीका काळे यांनी केली आहे.

हृदयात राम आणि हाताला काम हे हिदुत्व आहे असे बोलले जात आहे. मात्र, 82 वर्षाच्या आजीच्या घरी गेल्यावर काय अवस्था झाली होती असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आम्ही राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत. संजय राऊत यांची पात्रता नाही राज ठाकरेंवर बोलण्याची. तुम्ही संपादक कसे झाला आहात. हे अवध्या महाराष्ट्राला माहित आहे. आमच्या तोंडून वधवून घेऊ नका. बाळासाहेबांना जी वचने दिली होती ती उद्याच्या सभेत जाहीर करावीत. भोंगे बंद झाले पाहिजेत. रस्त्यावरचा नमाज बंद झाला पाहिजे. हे जर संजय राऊतांनी घोषित केले तरी आम्ही त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू, असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.