Eco friendly bappa Competition
घर मुंबई कीर्तिकरांनी आपलं स्टेटमेंट पुन्हा एकदा जाहीरपणे ऐकावे; संजय राऊतांचा सल्ला

कीर्तिकरांनी आपलं स्टेटमेंट पुन्हा एकदा जाहीरपणे ऐकावे; संजय राऊतांचा सल्ला

Subscribe

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी केंद्रातलं भाजप सरकार हे खासदारांना सापत्न वागणूक देतो असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. मात्र या वक्तव्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना माध्यमांनी प्रश्न विचारता असता त्यांनी गजानन कीर्तीकरांनी त्यांचं स्टेटमेंट पुन्हा एकदा जाहीरपणे ऐकावे, असा सल्ला दिला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut Advice to Gajanan Kirtikar should publicly hear his statement once again)

संजय राऊत म्हणाले की, गजानन कीर्तीकरांचं स्टेटमेंट होते की, संपूर्ण मिंधे गटाला सापत्न वागणूक मिळते. स्टेटमेंट मी ऐकलेले आहे. त्यांनी ते स्वत: पून्हा एकदा ऐकावे आणि जाहीरपणे ऐकावे. ते असे बोलले आहेत की, आम्हाला सापत्न सावत्रपणाची वागणूक मिळते. आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. एनडीएमध्ये आम्हाला मान सन्मान मिळत नाही. आम्हाला घटक पक्षाचा दर्जा नाही. हे गजानन किर्तीकरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. ते आमच्याकडे ज्येष्ठ नक्कीच होते, तिकडे आहेत की नाही माहिती नाही. तरी किर्तीकरांच्या बोलण्यामुळे आम्हाला वाटल की, इतका मोठा नेता आमच्याकडे होतो त्यांची तिथे काय अवस्था आहे. पण आता त्यांनी घुमजाव केला असं तुम्ही म्हणताय. यासाठी दबाव असू शकतो. पण त्याचं स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावे किंवा आपण सर्वांना ऐकवावे ते काय बोलले आहेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

- Advertisement -

हेही वाचा – परिणामांची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ; संजय राऊतांचे पंकजा मुंडेंना आवाहन

गजानन कीर्तीकर काय म्हणाले? 
आठवड्याभराूपर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना खासदार आणि नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी काही खासदारांनी भाजपविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकरांसोबत (gajanan kirtikar) काही खासदारांनी भाजप सोबत सत्तेत असताना आणि लोकसभेच्या जागावाटपावरून मोठं विधान केले होते. सरकारमध्ये भागीदार असली तरी भाजपाकडून समान वागणूक मिळत नसल्याची खंत या खासदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडे बोलून दाखवली. यावेळी त्यांनी निधीवाटपातही दुजाभाव होत असल्याचा आरोप केला असल्याचे समजते. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी प्रकल्पासाठी आम्हाला अधिक निधी मिळावा आणि भाजापकडून सापत्न वागणूक मिळत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -