घरमुंबईऑनलाईन 'गेम' खेळणे पडेल महागात, लावला जातोय सट्टा

ऑनलाईन ‘गेम’ खेळणे पडेल महागात, लावला जातोय सट्टा

Subscribe

ऑनलाईन गेम खेळणाऱ्या कंपनीवर सट्टा लावणे एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी 'गेम किंग इंडिया' या कंपनीच्या संचालकासह ९ जणांना क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेम खेळले जातात. या गेम खेळण्याच्या नावाखाली आता सट्टा देखील लावणात येत असल्याचे समोर आले. याप्रकरणी मुंबईतील ‘ऑनलाईन ‘गेम’ खेळणाऱ्या एका कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईतील ‘गेम किंग इंडिया’ या नावाने ऑनलाईन सट्टा चालवण्यात येत होता. या कंपनीचे संचालक आणि स्टॉल चालक यांच्यासह ९ आरोपींना सायबर क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये आचल चौरसिया आणि रमेश चौरसिया हे मुख्य आरोपी असून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

‘गेम किंग इंडिया’ कंपनी बंद

मुंबईमध्ये ऑनलाईन गेम खेळातून सट्टा लावणाऱ्या ‘गेम किंग इंडिया’ या कंपनीची दोन संकेतस्थळे पोलिसांनी बंद केली आहेत. ‘गेम किंग इंडिया’ या कंपनीच्या संकेतस्थळावर गेम खेळण्याच्या नादात भेट देणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याचे समोर आले.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अखेर कंपनीचे संचालक आणि त्याचे सहकारी यांना गुरुग्राम आणि हरियाणामधून अटक केली आहे. सदर आरोपींना अटक केल्यानंतर ३ जुलै रोजी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींना येत्या ५ जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून ऑनलाईन सट्टे लावण्यात येत आहेत. २०१४ सालापासून वेगवेगळ्या शहरातल्या पोलीस स्थानकामध्ये सट्टे लावण्याविरोधात १९ गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -