घरमुंबईगणपती विसर्जन : भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 10 विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था

गणपती विसर्जन : भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 10 विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था

Subscribe

मुंबई : मध्य रेल्वेकडून गणपती विसर्जनानिमित्ताने दहा विशेष लोकल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे गणपती विसर्जनाला जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासादायक बातमी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येथून हजारोच्या संख्येने नागरिक गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा आणि मढ येथे येतात.

यामुळे विसर्जनानंतर गणेशभक्तांना रात्री उशिरा घरी पोहोचता यावे. यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईनच्या अप मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.40 वाजता कल्याणसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर डाऊन मार्गावर रात्री 12.05 वाजता कल्याण-सीएसएमटीसाठी, 1 वाजता ठाण्याहून सीएसएमटी आणि रात्री 2 वाजता ठाण्याहून सीएसएमटीसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

तसेच हार्बर लाईनच्या डाऊन मार्गावर रात्री 1.30 वाजता आणि 2.45 वाजता सीएसएमटी-बेलापूर, अप मार्गावरील रात्री 1.25 वाजता आणि 2.20 वाजता बेलापूर-सीएसएमटी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

- Advertisement -

‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद

अनंत चतुर्दशीनिमित्त  मुंबईत मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नाथालाल पारेक मार्ग, कॅप्टन प्रकास पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे.एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस. अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन.एम. जोशी मार्ग, बी. जे. मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड, मौलाना शौकत अली रोड, डॉक्टर बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, 60 फिट रोड, मोहिम सायन लिंक रोड, टी.एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल.बी. एस.रस्ता, न्यू मिल रोड, संत रोहिदास मार्ग.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -