घरमुंबईGanesh Chaturthi 2021 : मुंबईतील गणेशोत्‍सव मंडळांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

Ganesh Chaturthi 2021 : मुंबईतील गणेशोत्‍सव मंडळांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

Subscribe

गणेशोत्सवात व इतक वेळेसेही पूर, आग , भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती घडल्यास मुकाबला कसा करावा याचे प्रशिक्षण मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिले. एखादी आपत्‍ती उद्भवल्‍यास त्‍यावेळी नेमक्‍या कोणत्‍या प्राथमिक हालचाली करुन आपत्‍तींचे निराकरण करावे, यासंदर्भात मार्गदर्शनही मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवक यांना मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभागाने दिले.

यंदाच्‍या गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास याप्रकारचे प्रशिक्षण देण्‍याविषयी विनंती केली होती. त्‍यास अनुसरुन हा उपक्रम ४ आणि ५ सप्‍टेंबर २०२१ असे दोन दिवस राबविण्‍यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांना या प्रशिक्षणात भाग घेता यावा यासाठी, शहर विभागातील मंडळांना परळ स्थिती शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात तर पूर्व उपनगरातील मंडळांना घाटकोपर भटवाडी महानगरपालिका शाळा येथे आणि पश्चिम उपनगरातील मंडळांकरिता जोगेश्वरी (पूर्व) मधील नटवरनगर महानगरपालिका शाळेत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्‍यात आली. कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक निर्देशांचे पालन करुन ही कार्यशाळा संपन्‍न झाली. तिन्ही ठिकाणी प्रत्‍येकी ५० याप्रमाणे एकूण १५० पदाधिकारी व स्वयंसेवक यांना हे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण देण्‍यात आले.

- Advertisement -

कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास, त्या आपत्तीचे त्वरित निराकरण करता यावे,हा या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आपत्ती म्हणजे नेमके काय, धोके कसे ओळखावेत, आपत्‍कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये, आग लागल्यास त्वरित करावयाच्या उपाययोजना, अग्निशमकांचा वापर, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती याबाबतचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये देण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्‍यात आला. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व १०८ आणीबाणी रुग्णसहाय्य सेवेचे अधिकारी उपस्थित होते.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -