घरगणेशोत्सव २०१९मुंबईतील गणेशोत्सवाचा कोटींचा विमा

मुंबईतील गणेशोत्सवाचा कोटींचा विमा

Subscribe

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईतील मोठमोठ्या मंडळांनी आपल्या बाप्पासह कार्यकर्ते व दर्शनाला येणार्‍या भक्तांचा विमा काढण्यास सुरुवात केली आहे. उत्सवादरम्यान दुर्घटना घडल्यास भक्त, कार्यकर्त्यांसह मंडळाच्या संपत्तीचे नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव विम्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मंडळाकडून काढण्यात येणार्‍या विम्याचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे.

गणरायाच्या दर्शनासाठी मुंबई, महाराष्ट्रासह देशविदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेकदा भाविकांच्या गर्दीला रोखणे हे पोलिस व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अवाक्याबाहेर जाते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. तसेच सध्या काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्याने उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणरायाची मूर्ती, त्यावरील दागिने, मंडप, दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते व भाविक यांचे कोणतेही नुकसान झाल्यास उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सवादरम्यान कोणतीही दुर्घटना घडून मंडळाचे किंवा भाविकांचे नुकसान होऊ नये यासाठी दरवर्षी गणेशोत्सव मंडळाकडून विमा कवच घेण्यात येते. मात्र यावर्षी बहुतेक मोठ्या मंडळांचा हा आकडा कोट्यवधीच्या घरात गेला आहे. किंग सर्कल येथील मुंबईतील प्रसिद्ध जी.एस.बी सेवा मंडळाने यावर्षी सर्वाधिक 266 कोटी 65 लाखांचा विमा काढला आहे.

- Advertisement -

मंडळांच्या विम्याचे वर्गीकरण

जीएसबी सेवा मंडळ २६६ कोटी ६५ लाख

भाविक व मंडळाचे कार्यकर्ते – २२४ कोटी ९० लाख
बाप्पाचे दागिने – २० कोटी ४० लाख
नैसर्गिक आपत्ती – १ कोटी
स्पेशल पेरील पॉलिसी – ३५ लाख

- Advertisement -

लालबागचा राजा २५ कोटी

नैसर्गिक आपत्ती – १२ कोटी
बाप्पाचे दागिने – ५.५ कोटी
भाविक – ५ कोटी
मुख्य मंडप – २.५ कोटी

काळाचौकीचा महागणपती १ कोटी

बाप्पाचे दागिने- २५ लाख
मुख्य- मंडप २५ लाख
भाविक- २५ लाख
कार्यकर्ते- २५ लाख

गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी भाविक गिरणगावात येतात. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हे मंडळाचे कर्तव्य आहे. केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्याने देशामधील वातावरण अशांतता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाचे तसेच भाविकांचे कोणतेही नुकसान होऊ यासाठी आम्ही विम्याचे कवच घेतले आहे. – अमन दळवी, प्रमुख कार्यवाह, काळाचौकी विभाग सार्वजनिक मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -