Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ganeshotsav 2021: मुंबईकरांनो, सार्वजनिक गणपती दर्शन यंदा फक्त ऑनलाईनच

Ganeshotsav 2021: मुंबईकरांनो, सार्वजनिक गणपती दर्शन यंदा फक्त ऑनलाईनच

Related Story

- Advertisement -

अजूनही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यंदाही अनेक गणेश मंडळ गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. मात्र आता मुंबईतील गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज लालबागमधील सर्व गणेमंडळांची मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईतील गणपतींचं ऑनलाईन दर्शन फक्त देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच यंदा मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाही आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे, तर दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तवण्यात येत आहेत. यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात यापूर्वीच राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत गणेशोत्सवाच्या दरम्यान सर्वाधिक गर्दी लालबाग येथे असते. लालबागमधील गणपतीच्या मूर्ती या २० ते २२ फूटाचा असतात. पण यंदा कोरोनामुळे गणपतीची मूर्ती ४ फूटांची असणार आहे. तरीही लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाच्या गणपतीचे दर्शन बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही आहे. बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी लालबागमधील सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे ऑनलाईन दर्शन ठेवण्यात येणार आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, रंगारी बदक, चिंचपोकळीचा चिंतामणीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. फक्त मंडळाच्या जवळचे रहिवाशी आणि स्थानिकांचा गणपतीचे ऑफलाईन दर्शन घेता येणार आहे.


हेही वाचा – गणेशोत्सव साजरा करा, पण निर्बंध पाळा


- Advertisement -

 

- Advertisement -