घर गणेशोत्सव 2023 गणेशोत्सव 2023 : 'बाप्पां'च्या दर्शनासाठी फडणवीसांनी गाठले 'शिवतीर्थ'; तर राज ठाकरे ‘अॅंटिलिया’वर

गणेशोत्सव 2023 : ‘बाप्पां’च्या दर्शनासाठी फडणवीसांनी गाठले ‘शिवतीर्थ’; तर राज ठाकरे ‘अॅंटिलिया’वर

Subscribe

आज 19 सप्टेंबर रोजी मोठ्या हर्षोल्हासात राज्यभर गणेशभक्तांनी बाप्पांचे स्वागत केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही घरी बाप्पांचे आगमन झाले.

मुंबई : गणेशोत्सव म्हणजे नवचैत्याची उधळण. अगदी सर्वसामान्य माणसापासून तर अगदी उद्योजक, सेलिब्रिटीपर्यंत सगळेच जण या उत्सवात सहभाही होतात. मग त्यात राजकीय नेते मागे राहतील ते कसे. यादरम्यानच आज गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीसुद्धा सोबत होत्या. मात्र, या भेटीनंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले.(Ganeshotsav 2023  Fadvisan reaches Shivatirth for Bappa darshan So Raj Thackeray on Antilia)

आज 19 सप्टेंबर रोजी मोठ्या हर्षोल्हासात राज्यभर गणेशभक्तांनी बाप्पांचे स्वागत केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही घरी बाप्पांचे आगमन झाले. दरम्यान या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ‘शिवतीर्थ’ येथे हजेरी लावली.

- Advertisement -

हेही वाचा : वाघाचे कातडे, नखे विकणारी टोळी बोरिवली पोलिसांच्या गळाला; 10 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून दिला होता इशारा

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचं काम चांगलं व्हावं यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला होता. तर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे नाशिक-अहमदनगर दौऱ्यावर असताना टोलनाका फोडल्याच्या घटनेवरूनही राजकारण तापले होते. यावेळी महाराष्ट्र भाजपने अमित ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. तेव्हा राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले की काय? अशी चर्चा रंगली होती. पण फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मंगलमूर्ती श्री गणराया… मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, बाप्पाचे जल्लोषात स्वागत

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे ‘अॅंटीलिया’वर

मुकेश अंबानी यांच्या ‘अॅंटीलिया’ या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने अंबानींच्या ‘अॅंटीलिया’ बंगल्यात चांगलीच लगबग बघायला मिळाली. जगभरातील आणि देशातील अनेक नामांकीत व्यक्ती अंबानींच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे देखील अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

- Advertisment -