घरमुंबईGaneshotsav 2023 : मुंबईत आज सात दिवसांच्या पाच हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

Ganeshotsav 2023 : मुंबईत आज सात दिवसांच्या पाच हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

Subscribe

मुंबई : यंदा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला आज सातव्या दिवशीही वाजतगाजत निरोप देण्यात आला. आज सातव्या दिवशी विधिवत पूजा केल्यानंतर लहानथोरांनी गणपतीसोबत गौरींनाही निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत लहान, तरुण मंडळी गटागटाने जात होती. (Ganeshotsav 2023 Immersion of five thousand Ganesha idols in Mumbai today for seven days)

आज रात्री नऊ वाजेपर्यंत समुद्र, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी सार्वजनिक 117 तर, घरगुती 4,883 अशा एकूण पाच हजार गणेश मूर्तींचे विधिवत पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले. यावेळी 85 गौरींचेही विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांशी वैयक्तिक शत्रुत्व नाही! प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

आज दिवसभरात सर्व विसर्जन स्थळी पाच हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 1,119 गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये, सार्वजनिक 40 तर 1,879 घरगुती मूर्तींचा समावेश आहे, तर 30 गौरींचेही आज विसर्जन करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी केलेल्या विविध सेवासुविधांचा गणेश मंडळे व गणेश भक्तांनी लाभ घेतला.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बीएमसी सज्ज

सालाबादप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे विसर्जन स्थळी व आवश्यक त्या ठिकाणी तब्बल 10 हजार कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधा उपल्बध केल्या आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण 198 कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ 2) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

हेही वाचा – लोकसभेच्या 48 जागांवर ‘वंचित’ची तयारी; प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला सात दिवसांचा अल्टिमेटम

मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या 8999-22-8999 क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -