Eco friendly bappa Competition
घर क्राइम वाघाचे कातडे, नखे विकणारी टोळी बोरिवली पोलिसांच्या गळाला; 10 लाख 60 हजाराचा...

वाघाचे कातडे, नखे विकणारी टोळी बोरिवली पोलिसांच्या गळाला; 10 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

Subscribe

बोरिवली पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे लांबलचक कातडे तसेच 12 वाघ नख्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबई : झटपट पैसे कमावण्याच्या नांदात कोण काय करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून, वाघाचे कातडे आणि नखे विकणारी टोळी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Gang selling tiger skins nails busted by Borivali police 10 lakh 60 thousand worth of goods seized)

सुरज (30), मोहसीन (35) आणि मंजूर (36) हे तिघे सराईत गुन्हेगार असून, या तिघांनी वाघाचे कातडे आणि वाघनखे विक्रीसाठी मुंबई् गाठली होती. मात्र, मुंबईत दाखल झाल्यानंतर या तीन गुन्हेगारांना बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तीनही आरोपींकडून पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार आले धावून; अल्पदरात मिळणार 3 लाखापर्यंतचे कर्ज

लांबलचक कातडी आणि 12 नखे आणली कोठून?

बोरिवली पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे लांबलचक कातडे तसेच 12 वाघ नख्या जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत 10 लाख 60 हजार रुपये इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ही कातडी आणि नखे आणली तरी कोठून याचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : 3847 कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोपाखाली अवर्सेकांवर गुन्हा; उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन चर्चेत

बोरिवली पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती

बोरिवली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही लोक हे महाबळेश्वर येथून वाघ नखे आणि कातड्यांची तस्करी करण्यासाठी बोरिवली पश्चिमेकडील एलआयसी ग्राउंड येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत वाघ नखांची आणि कातड्याची तस्करी करणाऱ्याना अटक केली. सध्या अटकेत असलेल्या सुरज लक्ष्मण कारंडे, मोहसीन नजीर जुंद्रे आणि मंजूर मुस्तफा मानकर एम एच बी कॉलनी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी ही वाघनखे आणि कातडे कुठून आणली आणि कुणाला विकणार होते याबाबत अधिक तपास बोरिवली कॉलनी पोलीस करत आहेत.

- Advertisment -