घरताज्या घडामोडीगँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरवर खंडणी विरोधी पथकात गुन्हा दाखल

गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरवर खंडणी विरोधी पथकात गुन्हा दाखल

Subscribe

गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वर आणि इतर दोन जणांवर मुंबईत क्राईम ब्रांचच्या अँटी एक्सटॉर्शन सेल खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या भारतात नसलेल्या अन्वरने ओशिवारा येथील एका बिल्डरला फोन करून धमकी दिली होती. तसेच ओशिवारातल्या एका एसआरए प्रकल्पात तडजोड करण्यासाठी अन्वरची मदत घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता मुंबई क्राईम ब्रांचने अन्वरसह दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -

अटक झालेल्या आरोपींची ओळख समोर आली आहे. अरबाज शेख आणि राजू ऊर्फ कामरान अशा इतर दोन आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अँटी एक्सटॉर्शन सेल एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘२०१६ पासून ओशिवारामधील एक क्षेत्र पुनर्विकासाखाली आहे.’ शेख याचा दावा आहे की, ‘परिसरात त्याचे आणि त्याच्या नातेवाईकांचे एकूण सहा घरे आहेत. उपलब्ध कागदपत्रांनुसार, त्याच्याकडे एकच घर असून यामध्ये बिल्डर आणि शेख यांच्यात वाद आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan Crisis: काबुल विमानतळाचे ATC ताब्यात घेण्याची अमेरिकेची घोषणा; नागरिकांच्या बचावासाठी ६,००० सैनिकांना केले तैनात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -