घरताज्या घडामोडीदगावला शेजारचा रुग्ण? बोंबाबोंब मात्र छोटा राजनच्या मृत्यूची

दगावला शेजारचा रुग्ण? बोंबाबोंब मात्र छोटा राजनच्या मृत्यूची

Subscribe

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोविडवर उपचार घेत असलेल्या कुख्यात डॉन छोटा राजनच्या शेजारच्या कॉटवरील रुग्ण दगावला आणि छोटा राजनचा मृत्यू झाल्याची सर्वत्र बोंबाबोंब झाली. अनेक वृत्तपत्राच्या ऑनलाईनवर छोटा राजची मृत्यूची बातमी प्रसारित होताच तिहार तुरुंग प्रशासनाने छोटा राजन जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. छोटा राजन याचा मृत्यूच्या खोट्या वृताने मात्र सर्वत्र खळबळ उडवून दिली होती.

इंडोनेशिया पोलिसांनी २०१५ मध्ये छोटा राजनला अटक केली होती. त्यानंतर त्याला काही वर्षांनी भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. सीबीआयने त्याचा ताबा घेऊन छोटा राजनला भारतात आणून त्याच्यावर असणारे गुन्हे एकत्र करून त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता. २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजनला दोषी ठरवून २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

छोटा राजनचा याचा मुक्काम तिहार तुरुंगात असून २२ एप्रिल रोजी त्याची कोविडची चाचणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी त्याला अधिक त्रास जाणवू लागल्यामुळे तसेच त्याला अनेक व्याधी असल्याकारणाने कडक सुरक्षेत त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या राजनच्या आजूबाजूला आणखी काही रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एक रुग्ण दगावला आणि रुग्णालयाच्या बाहेर छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मात्र रुग्णालय प्रशासन आणि तिहार तुरुंग प्रशासनानी खात्री केल्यानंतर छोटा राजन जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे कळले. तो पर्यंत छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा काही क्षणातच संपूर्ण देशभर पसरली. सोशल मीडियावर छोटा राजनच्या मृत्यूची वृत्त व्हायरल होऊ लागले अखेर तिहार तुरुंग प्रशासनाने छोटा राजन जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा केला असून अफवांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

सोशल मीडियाने अनेक गुंडांना मारले

अंडरवर्ल्ड डॉनचा मृत्यु झाल्याच्या अफवा अनेक वेळा पसरलेल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याचे वृत्त तर अनेक वेळा व्हायरल झाले आहे. सोशल मीडियाने डाउनच नाही तर अरुण गवळी, अस्विन नाईक ,रवी पुजारी, अबू सालेम, छोटा शकील यांचा मृत्युचे वृत्त सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -