मतांसाठी कल्याणमध्ये कचरा प्रकल्पांची केांडी?

स्थानिकांचा घनकचरा प्रकल्पाला विरोध असल्यामुळे तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यामुळे कचरा प्रकल्पांची कोंडी झाली आहे.

Garbage project will be cancel for elections?
मतांसाठी कल्याणमध्ये कचरा प्रकल्पाची केांडी?

कल्याणमधील कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच बारवे येथील प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. प्रक्लप रद्द न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा परिसर भाजपच्या खासदार आणि आमदारांच्या प्रभागात येत असल्याने मतांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीपर्यंत प्रकल्पाला स्थगित करण्याचा आदेश मंत्रालय स्तरावर आल्याचे खास सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मतांसाठी कचरा प्रकल्पाची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांमुळे घनकचरा प्रकल्प अडकून

कल्याणमधील आधारवाडी कचरा डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे पालिकेकडून बारवे येथे घनकचरा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कचऱ्या प्रकल्पामुळे इथल्या नागरिकांना त्रास होऊ शकतो असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरातील ५२ सोसायट्यांनी विरोध दर्शविला आहे. प्रकल्प रद्द न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. बारवे परिसर हा भिवंडी लोकसभा मतदार संघात येतो. याठिकाणी सुमारे २० ते २५ हजार मते आहेत. रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यास राजकीय पक्षांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपचे खासदार कपिल पाटील व आमदार नरेंद्र पवार यांनी याकडे मुख्यमंत्रालयाचे लक्ष वेधले होते. निवडणुकीनंतर यासंदर्भात बैठक घेण्याचे तोंडी आदेशही मुख्यमंत्रालयाकडून देण्यात आले होते. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून या कामाला ब्रेक बसला असून प्रशासनाने याबाबत मौन धारण केले आहे.

हा प्रश्न उपस्थित होतो 

उंबर्डे येथेही घनकचरा प्रकल्प राबविण्यात येत असून त्या प्रकल्पालाही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिकांच्या विरोधातच कचऱ्याचे प्रकल्प अडकून राहिले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांनी चार हजार शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यंदा ७७ वे स्थान मिळवले आहे. घनकचरा प्रकल्प मार्गी लागला नसल्याने महापालिकेचे गुण घटले आहेत. अन्यथा, पहिल्या ५० शहरांत येण्यासाठी महापालिका पात्र ठरली असती. अशाप्रकारे कचरा प्रकल्पाची केांडी होत असेल तर स्वच्छ कल्याण-डोंबिवली कशी होईल? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.