मेट्रो -२ ए मार्गिकेसाठी शिंपोलीत गर्डन टाकण्याचे काम पूर्ण

संपूर्ण उन्नत मार्गिकेच्या कामासाठी शिंपोली येथील नाल्यावर गर्डन टाकण्याचे कठीण काम पूर्ण झाले आहे.

दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो – २ ए मार्गिकेच्या एमएमआरडीएने गती दिली आहे. या संपूर्ण उन्नत मार्गिकेच्या कामासाठी शिंपोली येथील नाल्यावर गर्डन टाकण्याचे कठीण काम पूर्ण झाले आहे. मेट्रो -२ ए या मार्गिकेचे काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम आणखी लांबणीवर पडणार आहे. या कामाला गती देण्याच्या कामाला एमएमआरडीए लागली आहे.

जे. कुमार या कंपनीने एसएसए या ग्रुपसह मिळून दोन गर्डनचे काम नुकतेच पूर्ण केले. शिंपोली येथील नाल्यावर गर्डनच्या सहाय्याने ३६.६९ मीटर लांबीचे स्टीलचा पूल उभारला आहे. या मार्गिकेवरचे काम आव्हानात्मक असून ते पूर्ण करण्यात आले. या मार्गिकेवर एकूण १७ मेट्रो स्थानके उभारण्यात येणार आहेत. येत्या महिन्याभरात गोरेगाव पश्चिम येथे अशाच प्रकारचा गर्डन उभारण्यात येणार आहे. तसेच ओशिवरा मेट्रो स्थानक तयार होणार आहे. नंतर पोईसर नदी जवळ असेच गर्डरचे काम करण्यात येणार आहे.

मेट्रो-४ मार्गिकेवर ६० यु- गर्डरचे काम पूर्ण

घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेवर आणि कासारवडावली ते गायमुख या मेट्रो-४ च्या विस्तारीत मार्गिकेवर सध्या एमएमआरडीएने यु- गर्डर आणि पिअर कॅप बसवण्याची कामे पूर्ण केली आहेत. या मार्गिकेवर आत्तापर्यंत गेल्या एका महिन्यात तब्बल ६० यु- गर्डर बसवले असून १९ पिअर कॅप बसवल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे कामाला वेग

लॉकडाऊनमुळे रत्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने अवघ्या एका महिन्यात आम्हाला इतके काम करणे शक्य झाले असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.