घरमुंबई'गौरी -द अर्ज टू फ्लाय' पुस्तकाचं कव्हर लॉन्च

‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ पुस्तकाचं कव्हर लॉन्च

Subscribe

गौरी सावंत या पहिल्या तृतीयपंथी माता आहेत. तृतीयपंथी आणि वेश्या व्यावसायिकांच्या मुलांसाठी त्यांनी 'आजीचं घर' ही संस्था सुरु केली. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारे 'गौरी -द अर्ज टू फ्लाय' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.

आजही समाजात तृतीयपंथींना सामान्य लोकांसारखं स्थान दिलं जात नाही. नेहमीच अवहेलना आणि चेष्टा अशी वागणूक देऊन समाजापासून दूर असलेले तृतीयपंथ आजही आपण पाहतो. पण, या सर्व सीमांना दूर सारत तृतीयपंथ गौरी सावंत यांनी समाजापुढे आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, असं ठामपणाने सांगितलं. त्यानुसार त्यांनी कार्यदेखील केलं. यात त्यांना काहीसं यशदेखील मिळालं. गौरी सावंत यांचा हाच प्रवास आता एका पुस्तकातून आपल्याला वाचता येणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १२ मे २०१९ ला मातृदिनी होणार आहे. युवा लेखक रिदम वाघोलीकर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

‘राईट क्लीक पब्लिकेशन्स’ करणार प्रकाशित

गौरी सावंत या पहिल्या तृतीयपंथी माता आहेत. तृतीयपंथी आणि वेश्या व्यावसायिकांच्या मुलांसाठी त्यांनी ‘आजीचं घर’ ही संस्था सुरु केली. त्यांनी वेश्या व्यावसायातिल महिलांच्या लहान मुलांना ममता दिली. त्यामुळे जागतिक महिलादिनानिमित्त गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे ‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. ‘राईट क्लीक पब्लिकेशन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहे. गौरी सावंत यांनी एका सेक्स वर्करच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. असं करणाऱ्या गौरी सावंत या जगातील पहिल्याच तृतीयपंथी ठरल्या आहेत. त्यामुळे, गौरी सावंत आता फक्त तृतीयपंथीपुरतं मर्यादित न राहता कशापद्धतीने समाजात आणखी पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

पुस्तकातून गौरी सावंत यांचा जीवनप्रवास उलगडणार

‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ या पुस्तकातून गौरी सावंत यांचा जीवनप्रवास, संघर्ष, शोध पुस्तकात मांडण्यात आला आहे. त्यांच्या ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेतील त्यांच्या ‘नानी’ या व्यक्तिरेखेचे पैलू समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २००१ मध्ये गायत्रीला दत्तक घेतल्यानंतर ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्स वर्कर्स, जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे काम गौरी सावंत करत आहेत.

पुस्तकामुळे समाजात उपेक्षित राहिलेल्या माझ्यासारख्या समदुःखी तृतीयपंथी, वेश्या व्यावसायिक आणि जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना (हर्माफ्रोडाईट) न्याय मिळणार आहे. मला अतिशय आनंद वाटतो की, तृतीयपंथी समाजाला डावलले जाते अशी समाज प्रवृत्ती बदलण्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मदत होणार आहे. सेक्स वर्कर च्या‌ मुलींसाठी ८ मुलींना सांभाळण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. वयस्कर तृतीयपंथी या सेक्स वर्कर्सच्या मुलींचं संगोपण करणार आहेत. त्यातून नानी का घराची स्थापना होणार आहे. ज्याच्या साठी मला सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.
– गौरी सावंत 

तृतीयपंथी कल्याणकारी बोर्डाची गरज – गौरी सावंत

गौरी सावंत म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रात आजही अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांची नोंद केली गेली नाही. अनेकदा त्यांना योग्य शिक्षण, सुविधा ही मिळत नाहीत. अशा सर्व पार्श्वभूमीवर तृतीयपंथी कल्याणकारी बोर्डाची स्थापना करण्याची गरज आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -