घरमुंबई'पाटील' आडनावाच्या वादावर गौतमीने दिलं 'असं' उत्तर, राजकारणात येण्याच्या चर्चेला उधाण

‘पाटील’ आडनावाच्या वादावर गौतमीने दिलं ‘असं’ उत्तर, राजकारणात येण्याच्या चर्चेला उधाण

Subscribe

मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि तिच्याशी संबंधित वाद आता सर्वांनाच माहिती झाले आहेत. “सबसे कातिल गौतमी पाटील” हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. परंतु पाटील आडनावाची बदनामी केल्याचा आरोप होत असताना आता गौतमी पाटील राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गौतमी पाटील पालघरमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती, त्यावेळी पाटील आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटील म्हणाली की, मी गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला येत्या काही दिवसात कुणी काहीही बोलत आले आहे. पण त्याने मला फरक पडत नाही. मी त्यावर बोलणार नाही. यावेळी तिने राजकारणात येणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना म्हटले की, अशी चर्चा सुरू असली तरी तसे काहीही नाही. (Gautami gave ‘answer to ‘Patil’ surname controversy fueling the discussion of entering politics)

- Advertisement -

पाटील आडनावाचा काय आहे वाद?
“सबसे कातिल गौतमी पाटील” हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. परंतु आता अशी माहिती समोर येत आहे की, गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही तर, चाबुकस्वार आहे. त्यामुळे गौतमीने तिचे खरं आडनाव लावावे तिने ‘पाटील’ आडनाव लावू नये अशी भूमिका काही संघटनांकडून घेण्यात आली आहे. याशिवाय पाटील की चाबुकस्वार या आडनावावरून पुण्यात एक बैठक देखील घेण्यात आली. मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील व काही अन्य पदाधिकाऱ्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत इशारा दिला आहे की, गौतमी ‘पाटील’ आडनाव लावून पाटलांची बदनामी करते आहे. तिने पाटील हे आडनाव लावू नये. नाहीतर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही.

- Advertisement -

माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या
दरम्यान, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ होत असल्यामुळे तिच्यावर अनेक राजकीय लोकांनी आक्षेप घेत आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना गौतमीने म्हटले होते की, “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते आहे. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या? मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का?, असे प्रश्न तिने  उपस्थित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -