घरमुंबईगौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पेड पोलीस बंदोबस्त, भरावे लागणार 'एवढे' लाख

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पेड पोलीस बंदोबस्त, भरावे लागणार ‘एवढे’ लाख

Subscribe

मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि तिच्याशी संबंधित वाद आता सर्वांनाच माहिती झाले आहेत. तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांमुळे नेहमी धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. त्यामुळे या धक्काबुक्कीला लगाम लावण्यासाठी चक्क एका चाहत्यांने गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त ठेवला होता आणि त्याने यासाठी लाखभर रुपये खर्च केले. (Gautami Patil’s program will have to paid police endowment)

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. तिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरण नेहमीच दिसून येते. या गर्दीला आवर घालणे पोलिसांसमोर आणि आयोजकांसमोर एक आव्हान असते. सांगोला तालुक्यातील घिरडी गावामध्ये गौतमी पाटील आली होती. यावेळी कार्यक्रमात गर्दी होऊ नये आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी आयोजकाने पोलीस बंदोबस्तासाठी तब्बल 5 लाख रुपये शुल्क भरलयाचे समोर येत आहे. आबा मोठे असे आयोजकाने नाव आहे. त्याने शुल्क भरल्यानंतर 106 पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यासाठी आले होते. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर खिशात 5 लाख रुपये ठेवायला लागणार आहेत.

- Advertisement -

सशुल्क बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गौतमीच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला होता. त्यामुळे आम्ही पूर्व तयारी म्हणून 100 पोलीस कर्मचारी आणि 6 अधिकारी असा सशुल्क बंदोबस्त आयोजकांना प्रदान केला. आयोजकाने 5 लाख रुपयांचे शुल्क भरलयामुळे कार्यक्रम शांततेत सुरू होता.

माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात होणारा गोंधळामुळे राजकीय वर्तुळातही ती चर्चेचा विषय ठरली. छोटा पुढारी नावाने प्रसिद्ध असलेल्या घनश्याम परब याने गौतमी पाटीलचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?,” असा प्रश्न देखील तिच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, गौतमी पाटीलच्या या आधीच्या काही कार्यक्रमात गोंधळ झालेला पाहायला मिळाल आहे. बार्शीमध्ये कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी 15 ते 20 मिनिटात कार्यक्रम बंद पाडला होता. यावेळी कार्यक्रम पूर्ण न पाहता आल्यामुळे प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत नाराजी व्यक्त केली. या प्रेक्षकांना पोलिसांनी रोखले, मात्र कार्यक्रमाला झालेली गर्दी आणि प्रेक्षकांची नाराजी पाहता पोलिसांनी बंदोबस्तामध्येच गौतमी पाटीलला बाहेर काढले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -