घरमुंबईअमृता फडणवीस म्हणतात, 'गेट वेल सून शिवसेना'

अमृता फडणवीस म्हणतात, ‘गेट वेल सून शिवसेना’

Subscribe

‘सत्ताधारी शिवसेनेवर तुटून पडण्याचे काम आम्ही करु’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील सरकारवट टीका करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरे येथे मेट्रो कारशेड बनविण्यात येणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आरे मधील कारशेडला स्थगिती दिली होती. पर्यावरणाचा ऱ्हास करुन आम्हाला विकास नको आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र आता औरंगबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १ हजार झाडे तोडण्यात येणार असल्याची बातमी ट्विट करत अमृता फडणवीस यांनी सेनेवरच टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे. या ट्विटमध्ये शिवसेना ढोंगी असल्याचे त्या म्हणतात. “ढोंगीपणा एक आजार आहे. शिवसेनेने लवकर बरे व्हावे. जेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं, तेव्हा झाडं तोडलेली तुम्हाला चालतात. अक्षम्य पाप.” अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच एवढ्या कठोर शब्दात राजकीय भूमिका मांडलेली आहे. भाजपचे काही नेते देखील कंत्राटदारांकडून फायदा हवा असल्यामुळेच सरकारकडून सर्व प्रकल्पांना स्थगिती देत असल्याचा आरोप करत होते. त्यातच श्रीमती फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर कमिशनचा आरोप केला आहे.

- Advertisement -

फडणवीस यांच्या ट्विटनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चुतर्वेदी यांनी देखील ट्विट करुन पलटवार केला आहे. प्रियंका चतुर्वेदी म्हणतात की, “मॅडम तुमचा अपेक्षाभंग झाला त्याबद्दल खेद व्यक्त करते. मात्र सत्य हे आहे की, स्मारकाच्या कामासाठी एकही झाड तुटणार नाहीये. महापौरांनी याबद्दल भूमिका व्यक्त केलेली आहे. तसेच सतत खोटे बोलणे हा देखील एक आजार आहे. लवकर बरे व्हा.”

- Advertisement -

महाराष्ट्राने महायुतीला स्पष्ट कौल देऊनही उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. भाजपला ही गोष्ट जेवढी जिव्हारी लागली आहे, तेवढीच ती अमृता फडणवीस यांना देखील लागली आहे. त्यामुळेच सत्ता जाताच त्यांनी ‘लौटके आऊंगी मै’ अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेच्या विरोधात थेट आघाडी उघडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -