घरताज्या घडामोडीLockdown: मुंबई विमानतळावर ७४ दिवस अडकला फुटबॉलपटू; आदित्य ठाकरेंनी केली मदत

Lockdown: मुंबई विमानतळावर ७४ दिवस अडकला फुटबॉलपटू; आदित्य ठाकरेंनी केली मदत

Subscribe

घाना देशाचा फुटबॉलपटू रँडी जुआन मुलर याने आदित्य ठाकरे आणि राहुल कनाल यांचे आभार मानले आहेत.

लॉकडाऊनमुळे ७४ दिवस मुंबई विमानतळावर अडकलेल्या घाना देशातील फुटबॉलपटू रँडी जुआन मुलर याला हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तो सध्या आपल्या देशात जाण्यासाठी विमान सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहे. घानाचा फुटबॉलपटू मुलर केरळमध्ये क्लबसाठी खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यांची मदत केल्यामुळे शनिवारी त्याने महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे नेते राहुल कनाल यांचे आभार मानले.

मुलर याने आभार मानल्याचा व्हिडिओ युवासेनेचे नेते राहुल कनाल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. केरळमधील क्लबसाठी खेळायला आलेला मुलर केनिया एअरवेजच्या विमानाने मायदेशी परत जाणार होता. परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे तो मुंबई विमानतळावर अडकला.

- Advertisement -

राहुल कनाल म्हणाले की, तो विमानतळाच्या आकर्षक कृत्रिम बागांमध्ये आपला वेळ घालवायचा आणि स्टॉलवरून कसेबसे जेवण विकत घेत होता. तसेच विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत देखील तो वेळ घालवायचा. त्याला विमानतळावर कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली, असे मुलरने सांगितले.

- Advertisement -

मुलरला अनेक प्रवाशांनी पैसे आणि जेवणाची मदतही केली. याबाबत काही दिवसांपूर्वी मुलरने ट्विट केले आणि आदित्य ठाकरेंनी हे ट्विट पाहिले. त्यानंतर युवासेनेचे नेते राहुल कनाल यांनी वांद्रे येथील लकी हॉटेलमध्ये मुलरला नेले. मग घाना दुसतावासाशी त्याने संपर्क केला आणि त्याला घरी सुखरुप पोहोचवण्याचे कनाल यांनी आश्वासने दिले.


हेही वाचा – लॉकडाऊन शिथिल केल्याने भारतात करोना स्फोट होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -