घरमुंबईGharkul Scheme : घरकुल योजनांच्या कामांना मिळणार गती; अतुल सावेंकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Gharkul Scheme : घरकुल योजनांच्या कामांना मिळणार गती; अतुल सावेंकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Subscribe

मुंबई : मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून प्रत्येक गरजू व्यक्तीला घरे दिली जात आहेत. या योजनेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांना गती देऊन घरकुलांची कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज (21 फेब्रुवारी) अधिकाऱ्यांना दिले. (Gharkul scheme works will get speed up Instructions to officers from Atul Save)

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

- Advertisement -

अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बोलताना सावे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे, उपसचिव दिनेश चव्हाण तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. तसेच पात्र लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करावी, अशी सूचना सावे यांनी बैठकीत केली.

हेही वाचा – Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये या वर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळण्यासाठी आणि दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सर्व योजनांमधील प्रलंबित तसेच अपूर्ण असलेली घरबांधणी कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना अतुल सावे यांनी बैठकीत दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -