घरनवरात्रौत्सव 2022नवसाला पावणारी कसार्‍याची घाटनदेवी

नवसाला पावणारी कसार्‍याची घाटनदेवी

Subscribe

देवीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवीचे मंदिर रोषणाईने सजले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या घाटनदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. मंदिरालगत नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी यात्रा भरत असल्याने ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविक घाटनदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने येत आहेत.

मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात मुंबई-नाशिक महामार्गाजवळ नाशिक इगतपुरीच्या सरहदीवर घाटन देवीचं मंदिर आहे. संकटकाळी भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारी आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून घाटनदेवीची महिमा असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यातील भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. पहाटे पाचपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवासीही या ठिकाणी थांबून देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघत आहेत.

वाघावर आरुढ असलेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देते. घाटनदेवी मातेची विविध रूपे आहेत. यातील पहिले रूप शैलपुत्री, म्हणजेच घाटनदेवी होय. प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली. तीच ही घाटनदेवी होय, अशी देवीची आख्यायिका सांंगितली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -