घरमुंबईघाटकोपरचा पूर्व-पश्चिम पूल पुढच्या महिन्यात तोडणार

घाटकोपरचा पूर्व-पश्चिम पूल पुढच्या महिन्यात तोडणार

Subscribe

पूल धोकादायक ठरल्याने येत्या महिनाभरात तो पाडून नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी या नवीन पुलाच्या कामाच्या शुभारंभाला सुरुवात होणार आहे.

घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाल्यांवरील पूल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परंतु यामुळे निर्माण झालेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येनंतर अखेर स्थानिक नगरसेविकेच्या सुचनेनुसार हा पूल हलक्या वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हा पुल धोकादायक ठरल्याने येत्या महिनाभरात तो पाडून नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी या नवीन पुलाच्या कामाच्या शुभारंभाला सुरुवात होईल, असे पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

हलक्या वाहनांना तात्पुरता प्रवेश

घाटकोपर बस आगाराच्या बाजुला असणार्‍या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल मुंबई महापालिकेने शुक्रवारी अचानक बंद केला. त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला होता. घाटकोपर- अंधेरी लिंक रोड वरील हा मुंबईतील महत्वांच्या मार्गांपैकी एक मार्ग असल्याने येथे दररोज मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अचानक संध्याकाळीच पूल बंद केल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. या पुलाची आयआयटीच्या तज्ञांनी तपासणी केली आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेने लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालत, हलक्या वाहनांना तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. पण हा पूल तोडून नविन पूल बांधणे आवश्यक असल्यामुळे येत्या महिनाभरात हा पूल पाडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले. याला पालिकेच्या पूल विभागानेही दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

१९७१ साली बांधला होता पूल 

सीएसएमटी पूलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या पूल विभागाने मुंबईतील धोकादायक पुलांकडे आपले लक्ष केंदीत केले आहे. त्यामुळे एखादा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले की, तो तातडीने वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. हिमालय पुलाच्या दुर्घटनेत पूल विभागाच्या अनेक अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर काहींना अटकही झाली आहे. त्यामुळे या खात्याचा कोणताच अधिकारी जनतेचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल बंद करताना स्थानिकांचे मत जाणून घेतले नाही. त्यामुळे हा पूल बंद झाल्यावर वाहन चालकांची मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा १९७१ मध्ये बांधलेला हा पूल आता पाडून तेथे नविन पूल बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर वर्षभरात हा पूल उभारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न राहणार असल्याचे पूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.

हेही वाचा – 

- Advertisement -

घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बंद; मोठी वाहतूक कोंडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -