घरमुंबईभाईंदरमधील शिवसृष्टीला पुरातत्व विभागाची परवानगी

भाईंदरमधील शिवसृष्टीला पुरातत्व विभागाची परवानगी

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे सुशोभिकरण आणि शेजारील मोकळ्या नऊ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन व्हावे व किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. सरनाईक यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत घोडबंदर किल्ल्याचे जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाच्या यादीत समावेश करून घेतला होता. तर गेल्याच वर्षी राज्य सरकारने संरक्षित किल्ला म्हणून महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेत समावेश केला होता. त्यानंतर मीरा भाईंदर महापालिका आणि पुरातत्व विभागात करारही झाला होता.

किल्ल्याशेजारी असलेल्या ९ एकर जागेत शिवसृष्टी उभारणे कामी प्रकल्प अहवाल पुरातत्व विभागाकडे सादर केला होता. किल्ल्याच्या तटबंदीपासून ३५ मीटर अंतर सोडून शिवसृष्टी प्रकल्प साकारला जाणार आहे. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणतीही इजा पोचणार नाही, येथील घटक नष्ट होणार नाहीत याची दक्षता घेऊन काही अटींच्या अधीन राहून शिवसृष्टी प्रकल्पासाठी ना हरकत देण्यात आली आहे. सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांच्या स्तरावरून ही परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसृष्टीत शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले भव्य मंदिरही या शिवसृष्टीत बांधले जाणार आहे. इतिहासप्रेमी, अभ्यासकांना इतिहासाची माहिती देतानाच याठिकाणी म्युझिकल फाऊंटन, लँडस्केपिंग, लाईट व साऊंड शो अशी विविध कामे केली जाणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -