घरमुंबईगिरगावकरांच्या घरांवर मेट्रोसाठी एमएमआरडीएचा हातोडा ?

गिरगावकरांच्या घरांवर मेट्रोसाठी एमएमआरडीएचा हातोडा ?

Subscribe

रहिवाशांची इच्छामरणाची मागणी

गिरगावातून जाणारी मेट्रो मराठी कुटुंबांच्या मुळावर उठते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाने गिरगावमधील चाळी एकामागून एक गिळकृंत करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता क्रांतीनगरच्या चाळींची भर पडली आहे. क्रांतीनगरच्या १०३ मराठी कुटुंबांना रातोरात घर सोडण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे गिरगावकर संतापले असून, असे रोजच्या मरणापेक्षा आम्हाला इच्छामरण द्या, अशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

गिरगावातून जाणाऱ्या मेट्रो ३ प्रकल्पात बाधित होणाऱया कुटुंबांच्या पुनर्वसनाचे कोणतेही ठोस नियोजन न करता एमएमआरडीएतर्फे त्यांना जागा सोडून जाण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत आहेत. गिरगावकरांचा मेट्रो प्रकल्पाला वा मुंबईच्या विकासाला विरोध नाही. मात्र पुनर्वसनाबाबत गिरगावकरांना काही ठोस माहिती दिली जात नाही. पुनर्वसनाबाबत कोणताही लेखी करार केला जात नाही. ज्या चाळींत पिढ्यानपिढ्या मराठी कुटुंबे राहिली. त्यांना आता चाळ सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याचे पर्याय दिले जात आहेत. सुरुवातीला १९ इमारती प्रकल्पबाधित होणार, असे सांगितले होते. मात्र, आता अचानक क्रांतीनगरच्या एबीसी चाळीतील १०३ कुटुंबांना नोटीस पाठवण्यात आली आहे. डोक्यावरचे छप्पर जाणार या भितीने चाळकरी धास्तावले आहेत. घर जाण्याच्या टांगत्या तलवारीने रोज रोज मरण्यापेक्षा आम्हाला इच्छामरणच द्या किंवा स्वत: या विषयात जातीने लक्ष घाला, अशी मागणी मेट्रोबाधित चाळकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मेट्रो प्रशासनाने अशीच मनमानी सुरू ठेवली, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने दिला आहे.
दाराबाहेर नोटीस लावल्यापासून माझे आई-वडील अस्वस्थ आहेत. जागा देणार असे मेट्रो प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. पण त्याबद्दल कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. चार वर्षांचे भाडे देऊन स्थलांतरित करण्यावर त्यांचा भर आहे. पण चार वर्षांनंतर काय होणार..काहीच ठोस नाही. नुसते आश्वासन आहे.
– संदीप वासुदेव, रहिवासी
क्रांतीनगरच्या चाळीत आमचे गॅरेज आहे. या गॅरेजवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मेट्रोने ही जागा काबीज केल्यास तिथे गॅरेज पुन्हा चालवता येणार नाही. आमची चाळ मेट्रो प्रकल्पात गेली की उपासमारीची वेळ येईल.
– अजित वारंग, रहिवासी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -