Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नजरचुक पडली महागात! कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश आणि...

नजरचुक पडली महागात! कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश आणि…

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या धारावी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारावी परिसरात राहणाऱ्या एका मुलीने कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश केले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.

असा घडला प्रकार

मुंबईच्या धारावी परिसरात राहणारी मुलगी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यासाठी घराबाहेर गेली. ओट्यावर कोलगेटच्या शेजारी उंदीर मारण्याची पेस्ट ठेवली होती. मुलीच्या नजरचुकीने तिने कोलगेट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि तिच्याकडून ब्रश केला गेला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ब्रश करताना पेस्टची चव वेगळी लागत असल्याचे तिच्या लक्षात आले की आपण कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश करत आहेत तेव्हा तिला धक्का बसला.

- Advertisement -

यानंतर तिने लगेच तोंड धुतले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. उंदीर मारण्याच्या औषधाने ब्रश केल्याने त्याचे विष त्या मुलीच्या संपूर्ण शरीरात पसरले होते. विष पसरल्याने तिची तब्येत ढासळली. त्यामुळे तिला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात येत होते. रविवारी सायंकाळी डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


आम्हाला शत्रू मानून अमेरिका करत आहे मोठी चूक, पुन्हा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला; चीनी मीडियाचा इशारा
- Advertisement -