घरपालघरलोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत गाठलं रुग्णालय

लोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत गाठलं रुग्णालय

Subscribe

जीवघेणा हल्ला करत तरूणीला लुटलं

लोकलने प्रवास करताना अनेक प्रकार घडतात. यामध्ये महिलांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मात्र वसईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये लोकल प्रवास करताना तरूणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरूणीवर नुसता हल्लाच नाही तर तिला लुटण्यातही आलं. करण्यात आलेल्या या प्राणघातक हल्ल्यातनंतर तरूणी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ला झाल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तरूणीने रक्तबंबाळ अवस्थेतच रुग्णालय गाठलं. या घटनेतील आरोपी नेमका कोण होता? आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीची पडताळणी करत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, वसईमध्ये राहणारी तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तरुणीने वसई स्थानकावरील १ नंबर प्लॅटफॉर्मवरुन अंधेरीला जाणारी स्लो लोकल ट्रेन पकडली. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्यात चढला आणि त्याने तरूणीकडून फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा आरोपी महिलांच्या डब्यात शिरला.

- Advertisement -

यावेळी आरोपीने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एका वस्तूने प्राणघातक हल्ला करून त्याने तिच्या गळ्यातील चेन ओढली. तुटलेल्या चेनचा काही भाग उचलून त्याने नायगाव स्थानक येताच तो पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तरुणीच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं. तरुणी नायगाव स्थानकात उतरली आणि तिने रक्तबंबाळ अवस्थेतच रुग्णालय गाठलं. त्यानंतर तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. दरम्यान, तरूणींच्या कुटुंबियांनी या प्रकाराबद्दल वसई रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळतेय.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -