घरमुंबईलग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; आरोपी अटकेत

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; आरोपी अटकेत

Subscribe

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये एका विवाहित तरूणाने एका तरूणीशी जवळीक निर्माण करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तिला अनेक ठिकाणी फिरायला नेत तिच्यावर गेल्या ५ महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दर्शन भेकरे या तरूणाला अटक करण्यात आली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार; ठाण्यात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दर्शन भेकरे या तरूणाने तरूणीशी ओळख करून तिच्याशी जवळीक साधली. दर्शन याचे लग्न झालेले असताना देखील त्याने त्या तरूणीला ‘तु माझ्याशी लग्न करशील का?’, असे वारंवार विचारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवून गोव्यातील हॉटेल्स, मित्राच्या घरी, संगमेश्वर तसेच रत्नागिरी या ठिकाणी फिरायला घेऊन तिच्यावर तब्बल ५ महिने वेळोवेळी अत्याचार केला. या घटनेबाबत त्या तरूणीने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून दर्शन भेकरे याच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -