घरमुंबईविलेपार्ले रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग

विलेपार्ले रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग

Subscribe

या प्रकरणातील आरोपी शकील कुरेशीला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले रेल्वे स्थानकात एका २४ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणातील आरोपीला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. शकील शब्बीर कुरेशी (३०) असं या आरोपीचं नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शकीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शकील हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवाशी असून तो नोकरीसाठी मुंबई शहरात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितलं. तर २४ वर्षीय पीडिता एअरपोर्टवर कामाला आहे. रविवारी सकाळी सहा वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत कामावर जाण्यासाठी घरातून निघाली. विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवरुन जात असताना अचानक समोरुन आलेल्या शकीलने तिचे दोन्ही हात पकडले. हात पकडल्यानंतर तो तिच्याशी अश्लील वर्तन करु लागला.

अचानक घडलेल्या या प्रकारानंतर पीडिता आणि तिची मैत्रिण प्रचंड घाबरुन गेल्या. त्या दोघींनी आरडाओरड करुन लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर त्वरित काही प्रवाशांनी आरोपी शकीलला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर शकील विरोधात लेखी तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शकीलविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शकील हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. बेरोजगार असलेला शकील मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. रविवारी तो विलेपार्ले रेल्वे स्थानकात फिरत असताना त्याने पीडितोसोबत अशाप्रकारे गैरवर्तन केले. सध्या याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


अनोखं मातृप्रेम : आईला ‘स्कूटर’वर घेऊन तो निघाला ‘भारत’ भ्रमंतीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -