घर मुंबई उल्हासनगरमध्ये तरुणीचे अपहरण करणारा अटकेत

उल्हासनगरमध्ये तरुणीचे अपहरण करणारा अटकेत

Subscribe

उल्हासनगर येथे तरुणीला तलवारीचा धाक दाखवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथील पोलिसांचे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून एका सराईत गुंडाने तलवारीचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ चिंट्या प्रकाश शिंदे (२५) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.


हेही वाचा – भिवंडीतून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण


नेमके काय घडले?

- Advertisement -

उल्हासनगर ४ येथील सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या आकाश उर्फ चिंट्या प्रकाश शिंदे (२५) या सराईत गुंडाला पोलीस परिमंडळ ४ च्या आदेशानुसार तडीपार करण्यात आले आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून तो उल्हासनगर शहरात राजरोसपणे फिरत होता. मंगळवारी सायंकाळी उल्हासनगर ४ परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीच्या घरात तो घुसला आणि त्यांनी तलवारीचा धाक दाखवून तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीच्या आई समोर तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न देखील केला. याप्रकरणी पीडित तरुणीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुंड आकाश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – माहिममध्ये अपहरणकर्त्याला अटक


- Advertisement -

 

- Advertisment -