घरमुंबईवांद्रे येथे 24 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

वांद्रे येथे 24 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

Subscribe

वांद्रे येथे एका 24 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करुन तिला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी ध्रुवील शहा नावाच्या एका तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. ध्रुवील हा अहमदाबादच्या एका व्यापार्‍याचा मुलगा असून सध्या तो हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी अटक केली.

वांद्रे येथे एका 24 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करुन तिला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी ध्रुवील शहा नावाच्या एका तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. ध्रुवील हा अहमदाबादच्या एका व्यापार्‍याचा मुलगा असून सध्या तो हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अश्लील मॅसेज पाठविल्यांनतर या तरुणीला त्याला धडा शिकविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली होती, त्यात तो अलगद सापडला.

तक्रारदार तरुणी ही एका खाजगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. दिड महिन्यांपूर्वीच तिची सोशल मिडीयाच्या माध्यमातून ध्रुवीलशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो विदेशात राहत असून गर्भश्रीमंत असल्याची बतावणी केली होती. त्याच्याशी केलेल्या संभाषणानंतर तो तिची फसवणुक करीत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. काही दिवसांनी तो तिला अश्लील मॅसेज पाठवू लागला, तिने त्याला अशा प्रकारे अश्लील मॅसेज पाठवू नकोस अशी ताकिदही दिली होती. तरीही तो तिला अश्लील मॅसेज पाठवून तिचा मानसिक शोषण करीत होता. त्यामुळे तिने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री दहा वाजता तिने त्याला वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात भेटण्यासाठी बोलाविले होते, त्याने होकार देताच तिने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. ही तरुणी तिच्या एका नातेवाईकासोबत तिथे गेली होती. रात्री अकरा वाजता तिथे ध्रुवील आला आणि त्यांच्यात अश्लील मॅसेजवरुन वाद सुरु झाला होता. त्याने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. तिने पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळात तिथे वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक आले होते. या पथकाने ध्रुवील शहाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तरुणीच्या तक्रारीवरुन त्याला नंतर विनयभंग आणि आयटी कलमांतर्गत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ध्रुवील हा सध्या कल्याण येथे राहत असून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहेत. त्याचे वडील अहमदाबादचे एक व्यापारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -