घरताज्या घडामोडी'ST कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्या'

‘ST कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्या’

Subscribe

एसटी कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.

जगभरातील अनेक कोरोनालसींचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. भारतातील लसीदेखील येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहेत. मुंबई महानगर पालिकेकडून पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचार्‍यांची वाहतूक एसटी कर्मचार्‍यांनी केली आहे. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागणसुध्दा झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांबरोबर एसटी कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.

आतापर्यंत एसटी महामंडळात ९८ कर्मचार्‍यांच्या कोरोनामुळे मृत्यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २३ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाऊन काळात कोरोना विषाणू विरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि परिचारिका अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. ह्या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातून कर्तव्यावर येण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत होत्या. एसटी कर्मचारी अधिकारी हे देखील अत्यावश्यक सेवा म्हणून जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत होते. या दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. तर अनेकांचे कोरोनामुळे मृत्यू सुध्दा झालेल्या आहे. आतापर्यंत एसटी महामंडळात ९८ कर्मचार्‍यांच्या कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या आहे. तर ३ हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचार्‍यांना कोरोनाची बांधा झाली आहे. त्यामुळे शासनाने आणि मुंबई महानगर पालिकांने पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांच्या समावेश करावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण करणार आहे, पण लॉकडाऊन झाल्यापासून आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूक करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण का नाही? आमच्याही चालक आणि वाहकांचे पहिल्या टप्यात लसीकरण करावे. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -