घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र पोलिसांना फक्त ४८ तास मोकळं सोडा, बघा काय होतं? - राज...

महाराष्ट्र पोलिसांना फक्त ४८ तास मोकळं सोडा, बघा काय होतं? – राज ठाकरे

Subscribe

पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून एकट्या बांगलादेशातूनच २ कोटी लोक भारतात राहत आहेत. त्यामुळे देशात सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा ताण पोलिसांवर येतो. देशात कुठूनही माणसे येत आहेत आणि अनुचित प्रकार घडल्यानंतर आपण पोलिसांना बोल लावतो. माझे महाराष्ट्र सरकारला आवाहन आहे की, त्यांनी पोलिसांना ४८ तास मोकळे द्यावेत. हे पोलीस ४८ तासांत क्राईम रेट शून्यावर आणू शकतात, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “हिंदू म्हणून आपण बेसावध आहोत. आपण फक्त दंगल झाली की हिंदू असतो. एरवी आपल्याला कळत नाही. मात्र ते लोक जागृत आहोत. भारतातील एक जागा आहे, जिथे अनेक देशांमधून मौलवी येत आहेत, याची माहिती लवकरच गृहमंत्र्यांना देणार आहे. आपण काय करायचं बॉम्बस्फोट झाला की मेणबत्त्या बाहेर काढायच्या. त्यानंतर आपण शांत बसायचं.”

- Advertisement -

पाकिस्तान, बांगलादेशी घुसखोरांमुळे इथल्या पायाभूत सोयी-सुविधा आणि पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. मागच्यावेळी रझा अकादमीच्या मोर्चात पोलिसांवर हात उचलला गेला होता. महिला पोलिसांवर हात टाकला गेला होता. अशा बंदोबस्त करायला नको का? या देशात मुस्लिमांना जेवढे स्वातंत्र्य दिले आहे. तेवढे कोणत्याही देशात दिले जात नाही. त्यामुळे एकोप्याने रहा, असा संदेश देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -