घरमुंबईमुंबई विद्यापीठास ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार प्राप्त

मुंबई विद्यापीठास ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार प्राप्त

Subscribe

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील २०१९ चा ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील २०१९ चा ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार राजस्थान मधील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये प्रदान करण्यात आला असून विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.विनोद पाटील यांनी स्वीकारला आहे.

स्कुन्यूज ग्लोबल एज्युकेशन शिक्षणाविषयी

राजस्थानमधील स्कुन्यूज ग्लोबल एज्युकेशन ही शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याचे कार्य करते. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार लढाखमधील शिक्षणात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे सोनम वायचुंग आणि राजस्थानमधील विज्ञान ट्रस्टचे विश्वस्त लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाने विद्यापीठात विविध ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि त्याला चांगले यश मिळाले, याचाच परिणाम हा पुरस्कार मुंबई विद्यापीठास प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

ऑनलाइन केले मूल्यांकन

मुंबई विद्यापीठाने २०१७ च्या उन्हाळी सत्राच्या परिक्षांपासून सर्व परीक्षांसाठी
संगणकाधारीत मूल्यांकन पद्धत म्हणजेच (ऑनस्क्रीन मार्किंग) सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्याचे शिक्षकांमार्फत ऑनलाइन मूल्यांकन करून घेतले. प्रत्येक परीक्षेतील ४५० पेक्षा जास्त परीक्षांचे संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ओएसएम पध्दतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने यानिमित्ताने त्याचा गौरव यावेळी करण्यात आला.


हेही वाचा – पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

- Advertisement -

ओएसएमबरोबर मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पेपर डिलिव्हरी मार्फत ८१९ पेक्षा जास्त महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका थेट पाठविली जाते. प्रश्नपत्रिका छपाईचा, वाहतुकीचा खर्च व वेळ यातून वाचला. तसेच सुरक्षितरित्या या प्रश्नपत्रिका परिक्षेपूर्वी महाविद्यालयाला जाऊ लागल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर त्या त्या महाविद्यालयाचे नाव छापले जाते. तसेच ऑनलाईन पुनर्मुल्यांकन, ऑनलाईन पीएचडी प्रवेश परीक्षा, ऑनलाईन परीक्षा अर्ज, ऑनलाईन प्रवेश, ऑनलाईन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोयी सुविधा मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत. यामुळेच हा पुरस्कार विद्यापीठास प्राप्त झाला आहे.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन येथील विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयाला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासनात गतिमानता आणणे हाच उद्देश आहे. भविष्यातही अनेक सुविधा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करून दिल्या जातीलडॉ.सुहास पेडणेकर; कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -