घरCORONA UPDATECoronaVirus : ग्लोव्हज, एन - ९५ च्या किमतीवर येणार नियंत्रण

CoronaVirus : ग्लोव्हज, एन – ९५ च्या किमतीवर येणार नियंत्रण

Subscribe

बाजारामध्ये अचानक मागणी वाढल्याने काळ्या बाजारात विक्री होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने त्याची नोंद अत्यावश्यक सेवेत केली.

कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना योद्ध्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वच सध्या एन – ९५ मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करत आहेत. बाजारामध्ये अचानक मागणी वाढल्याने काळ्या बाजारात विक्री होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने त्याची नोंद अत्यावश्यक सेवेत केली. मात्र तरीही या दोन्ही वस्तू मूळ किमतीपेक्षा चढ्या भावाने विकल्या जात आहेत. त्यामुळे अशा चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा एनपीपीएने दिला आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी एन -९५ मास्क आणि ग्लोव्हजची आवश्यकता असल्याने, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि सर्वसामान्य व्यक्तींकडून याची मागणी वाढू लागली. कोरोनाचा देशामध्ये प्रसार होण्यापूर्वी काही ठराविक प्रमाणात एन -९५ मास्क आणि ग्लोव्हजचा वापर केला जात असे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच यांच्या मागणीमध्ये अचानक प्रचंड वाढ झाली. त्यामुळे एन -९५ आणि ग्लोव्हजचा साठा करून काळ्या बाजारात त्याची विक्री करून सर्वसामान्यांची लूट होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणने (एनपीपीए) १३ मार्च २०२० रोजी अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत या दोन्ही वस्तूंचा समावेश अत्याश्यक सेवेत केला. त्यानुसार याचा साठा करणाऱ्या आणि काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले होते.

- Advertisement -

तरीही अनेक उत्पादक, वितरक, विक्रेते यांच्याकडून एन- ९५ मास्क आणि ग्लोव्हज हे छापील किमतीपेक्षा चढ्या दराने विकण्यात येत होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच खासगी हॉस्पिटल, नर्सिंग होम, डॉक्टर यांना बसत होता. त्यांना या गोष्टी चढ्या दराने विकत घ्याव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. यासंदर्भात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून एन -९५ आणि ग्लोव्हजच्या किमती नियंत्रीत कारण्यासंदर्भात एनपीपीएकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत एनपीपीएने उत्पादक, वितरक यांना एन -९५ मास्क हे रास्त दरातच देशात उपलब्ध झाले पाहिजेत, असे निर्देश दिले आहेत. तसेच गैरसरकारी स्तरावर एन- ९५ मास्क खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व संस्थेसाठी किंमत समान असली पाहिजे. त्याचबरोबर एन -९५ मास्कची साठेबाजी, काळाबाजार आणि छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होताना आढळल्यास त्यावर अत्यावश्यक सेवावस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक एनपीपीएचे सहायक संचालक अलोक रंजन यांनी काढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -