घरमुंबईमुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शालेय विद्यार्थ्यांबाबत दिला मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शालेय विद्यार्थ्यांबाबत दिला मोठा निर्णय

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शालेय विद्यार्थ्यांच्याबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, शाळेत विद्यार्थ्याला मारहाण करणे हा गुन्हा नाही, असा निकाल देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिस्त शिकवण्यासाठी काही वेळा शिक्षकांना कठोर वागावे लागते. तसे न केल्यास विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणे फार कठीण होईल, असे खंडपीठाने सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शाळेतील शिस्त पाळण्यासाठी विद्यार्थ्याला फटकारणे किंवा शिक्षा करणे हा गुन्हा ठरणार नाही, असा निकाल दिला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या शिक्षेचा आदेश रद्द करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या शिक्षकावर आपल्या शाळेतील दोन मुलांना काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी या शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती.

याप्रकरणी सुनावणी करताना भरत देशपांडे यांच्या उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, प्राथमिक शाळांमध्ये घडणाऱ्या या घटना सामान्य आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना काहीवेळा थोडे कठोर व्हावे लागते. त्यामुळे हा काही गुन्हा नाही. विद्यार्थ्यांना शाळेत यासाठीच पाठवले जाते कारण त्यांच्या जीवनात त्यांना शिस्त लागली पाहिजे. जीवनातील आचरणांबद्दल त्यांना माहिती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा उद्देश केवळ त्यांना शैक्षणिक माहिती मिळणे नाहीये तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी त्यांना शिस्त लावणे देखील महत्वाचे आहे. ज्यामुळे ते भविष्यात चांगले व्यक्ती बनतील.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?
2014 मध्ये एका शिक्षकावर दोन बहिणींना बेदम मारण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी एक मुलगी पाच वर्षांची तर एक मुलगी आठ वर्षांची होती. या घटनेमध्ये एका लहान मुलीने तिच्या बॉटलमधील पाणी संपल्याने तिच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या बॉटलने पाणी पिले होते. लहान बहिणीच्या बॉटलमधील पाणी संपल्याने तिची मोठी बहीण हे पाहण्यासाठी तिच्या वर्गात आली होती. त्यानंतर त्या शिक्षकाने या बहिणींना पट्टीने मारहाण केल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा – सावधान ! परफ्यूमच्या बाटलीत लपवलेला असू शकतो बाॅम्ब

- Advertisement -

शिक्षक कठोर असायला हवे
न्यायालयाने म्हटले की, “दुसऱ्याच्या बाटलीतून पाणी पिणे हे शालेय शिस्तीच्या विरोधात आहे, असे केल्याने शाळेतील अन्य विद्यार्थ्याच्या पालकांकडून तक्रार होऊ शकते. यामुळेच शिक्षकाने हे पाऊल उचलले होते. जर विद्यार्थी शिक्षकांकडून वारंवार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करत नसतील तर शिक्षकांना कठोर होणे बंधनकारक आहे. दरम्यान, या घटनेत मारहाण करताना काठीचा किंवा पट्टीचा वापर करण्यात आला होता की नाही हे सिद्ध झालेले नाही, असेही उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करणे फार महत्वाचे
याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, ‘शिक्षकांना समाजात सर्वोच्च मान दिला जातो. ते आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. अशा क्षुल्लक गोष्टींसाठी आणि विशेषतः मुलांना योग्य शिस्त शिकवताना शिक्षकांच्या मनात आरोप होण्याची भीती असेल तर शाळांमध्ये योग्य शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिस्त लावणे कठीण होऊन जाईल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -