घरमुंबईसौरभ चौधरीची सुवर्ण कमाई

सौरभ चौधरीची सुवर्ण कमाई

Subscribe

२४५ गुण कमवत जेतेपदासह ऑलिम्पिकचेही तिकीट केले पक्के

भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी भारतातच सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत विश्वविक्रम करत सुवर्णपदक मिळवले. सौरभने १० मीटर एयर पिस्तूल स्पर्धेमध्ये हे पदक मिळवले. या विजयामुळे पहिल्यांदाच नेमबाजी विश्वचषकात खेळणार्‍या सौरभने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही आपला प्रवेश निश्चित केला. सौरभने अंतिम फेरीत २४५ गुणांसहित विश्वविक्रमाचीही नोंद केले. जर्मनीत झालेल्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत सौरभने विश्व विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक मिळवले होते. याआधी हा विक्रम चायनीज ताईपेच्या वँग झेहाओच्या (२४२.५) नावे होता. सर्बियाच्या दामिर माईकने २३९.३ गुणांसह रौप्यपदक मिळवले.

अंतिम फेरीच्या सुरुवातीपासूनच सौरभने दमदार खेळ केला. सौरभची कामगिरी इतकी चांगली होती की त्याने शेवटच्या प्रयत्नापूर्वीच सुवर्णपदक निश्चित केले होते. त्यानंतर अखेरच्या प्रयत्नात सौरभने २०.२ गुण मिळवत विश्वविक्रम त्याच्या नावे नोंदवला. ज्युनियर श्रेणीत सौरभचा जागतिक विक्रमही आहे. अंतिम फेरीत सुरुवातीच्या पाच फेर्‍यांनंतर सौरभ आणि सर्बियाच्या दामिर माईक हे दोघेही पहिल्या स्थानावर होते. मात्र, १० फेर्‍यांनंतर सौरभने १०२.२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. माईकला ९९.६ गुणांसह दुसर्‍या स्थानावर होता. अखेर हे दोघेच पहिल्या आणि दुसर्‍या स्थानी राहिले, तर चीनच्या वेई पँग २१५.२ गुणांसह कांस्यपदक मिळवले. सौरभने पात्रता फेरीत ५८७ गुण मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

- Advertisement -

राष्ट्रकुल आणि युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकरला २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -