Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई सोन्याने गाठला २०१६ पासूनचा निच्चांक

सोन्याने गाठला २०१६ पासूनचा निच्चांक

कोरोनावर लसीच्या प्रगतीमुळे गुंतवणुकदारांची पाठ

Related Story

- Advertisement -

सोन्याच्या दरांच्या किमतीमध्ये सोन्याने गेल्या चार महिन्यातला निच्चांक गाठला आहे. त्याहून महत्वाच म्हणजे गेल्या चार वर्षातलाही हा निच्चांक आहे. कोरोनावर लस आणण्यासाठीच्या प्रयोगांनी घेतलेल्या वेगामुळे त्याचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे. सोन्यामधील गुंतवणुक याच गोष्टीमुळे कमी होत आहे.

सोमवारी सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ७६३ रूपये इतका होता. जवळपास १ टक्क्यांनी या दरामध्ये घसरण झाली. कोरोनावर लस येण्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानेच सोन्यामधील गुंतवणुक कमी होतानाचा ट्रेंड सध्या मार्केटमध्ये दिसू शकत आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये सुमारे ५ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. तर गेल्या चार महिन्यातही सोन्याची ही मोठी घसरण म्हणून समोर आली आहे. कोरोनावर लस येण्याची चर्चा सुरू झाल्यानेच सोन्यामधील गुंतवणुकीवर परिणाम पहायला मिळाला आहे. कोरोनावर लस येण्याची चिन्हे निर्माण झाल्यानेच आता अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही सोन्याला मिळणारे झुकते माप आता कमी होऊ लागले आहे. सोन्याच्या दरातील हीच घसरण आगामी कालावधीतही पहायला मिळेल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे डॉलरच्या तुलनेत रूपयाचे सतत होणारे अवमूल्यन. गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्याने डॉलरच्या तुलनेत घसरणारा रूपया पाहता आता सोन्याला पुन्हा झळाळी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या संकेतामुळे सोन्याच्या दरात कपात झालेली पहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावातील घसरणीमुळे सोन्याची किंमत ही १७८१.५० डॉलर प्रति औंस इतकी आहे. जागतिक पातळीवरही कोरोनावर निर्माण होणाऱ्या लशीच्या निर्मितीमुळे गुंतवणुकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीतून काढता पाय घेतल्याचे वातावरण पहायला मिळत आहे. आज दिल्लीत सोन्याच्या भावात १४२ रूपयांची घसरण होत, सोन्याची किंमत ४७ हजार ४८३ रूपये इतकी खाली घसरली. तर मुंबईत सोन्याची किंमत ही ४८ हजार २४० रूपये इतकी होती. सोन्याच्या किंमतीत आज २० रूपयांची घसरण पहायला मिळाली आहे.


 

- Advertisement -

 

- Advertisement -