घरताज्या घडामोडीGold Silver Price: मुंबई,पुण्यात २४ कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे, पहा...

Gold Silver Price: मुंबई,पुण्यात २४ कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे, पहा किंमती

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ उतार

सोने चांदीचे दर गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. सोन्याच्या किंमती पार ५० हजारांच्या घरात पोहचल्या होत्या. शनिवारी मात्र बाजार बंद होताना सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे रविवारी सोन्याच्या किंमतीत २० रुपयांनी घट झालीय तर चांदीच्या किंमतीत तब्बल २०० रुपयांनी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यात आज सोन्या चांदीच्या किंमतीत झालेली घसरण पाहून ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ७४० प्रतितोळा इतके आहेत. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४८ हजार ७४० रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या दरातही २०० रुपयांनी घट होऊन एक किलो चांदीची किंमत ७२ हजार २०० इतकी आहे. (Gold Silver Price: In Mumbai, Pune, you have to pay 48,740 rs for 24 carat gold)

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. २ जून रोजी सोन्याची किंमत ४९ हजार २३० होती तर तिच किंमत १० जून रोजी १२० रुपयांनी घसरली. चांदीच्या किंमतीचा विचार केला असता, २ जून रोजी चांदीचा भाव हा ७१ हजार ९०० इतका होता. शुक्रवारी चांदीच्या भावात १ हजारांनी वाढ झाली तर आज तब्बल २०० रुपयांची घसरण पहायला मिळाली.

- Advertisement -

मागील दहा दिवसात सोन्या चांदीच्या दरात किरकोळ बदल झाले असले तर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र न परवडणारी आहे. मुंबईत इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचे भाव ठरवले जातात. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट आहे त्याठिकाणी सोन्याचे भाव ठरवले जातात. सोन्याचे दर निश्चित करताना स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार करण्यात येतो.


हेही वाचा – सर्वसामान्यांना दिलासा! डोंबिवलीत आज मिळणार १ रुपया प्रतिलिटरने पेट्र्रोल

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -