घरताज्या घडामोडीगुडन्यूज! Covid-19 महामारीतील योद्धांसाठी घरकुल योजना; नगरविकास मंत्र्यांची घोषणा

गुडन्यूज! Covid-19 महामारीतील योद्धांसाठी घरकुल योजना; नगरविकास मंत्र्यांची घोषणा

Subscribe

राज्यात कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला. यादरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोविड योद्धे आपल्या जीवाची परवा न करता काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटे दरम्यान अहोरात्र मेहेनत घेणाऱ्या कोविड योद्धांना आता सिडको घरकुल योजना घेऊन येणार आहे. यासंदर्भातील घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

सिडको एलटीडी या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून कोविड योद्धांच्या कटीबद्धतेस सिडको महामंडाळाचा सलाम. लवकरच, असे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांसाठी घरकुल योजना येत असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदे ट्वीट करून सांगितले की, ‘राज्यातील पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करत तो नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र मेहेनत घेणाऱ्या कोविड योद्ध्यांकरीता सिडको घेऊन येत आहे नवी मुंबईत घरकुल योजना.’

- Advertisement -

यापूर्वी सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हमरापूर येथे करण्यात येत असलेल्या मायक्रो टनेलिंग तंत्रज्ञानामुळे हेटवणे धरणातून २०-३० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच मौजे कामोठे आणि मौजे पनवेल येथील २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्र राज्य वन विभागाकडे सुपूर्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन होईल तसेच पर्यावरणपूरक विकासास मदत होईल.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -