घरमुंबईमुंबईकरांसाठी खुशखबर! विहार तलाव भरुन वाहू लागला

मुंबईकरांसाठी खुशखबर! विहार तलाव भरुन वाहू लागला

Subscribe

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७ हजार ६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, August 5, 2020

विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती –

  • मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
  • या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

हेही वाचा –

Mumbai Rain: जोरदार पावसाने मुंबईत मोडला ४६ वर्षांचा विक्रम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -