घरCORONA UPDATEदिलासादायक, कोरोनाचे आढळले सर्वात कमी रुग्ण, 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही

दिलासादायक, कोरोनाचे आढळले सर्वात कमी रुग्ण, 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही

Subscribe

नवी दिल्ली : भारतात मंगळवारी कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 625 नवेन रुग्ण आढळले. कोरोनाची ही नवीन प्रकरणे 9 एप्रिल 2020नंतर (30 महिने) सर्वात कमी आहेत. याशिवाय, मार्च 2020नंतर प्रथमच गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे एकाही मृत्यूची झालेली नाही.

सकाळच्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 62 हजार 141 (4,46,62,141) झाली आहे. देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण 14 हजार 21 वर आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 30 हजार 509 (5,30,509) आहे.

- Advertisement -

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी, 9 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचे एकूण 540 नवीन रुग्ण आढळले होते. तर, मार्च 2020नंतर प्रथमच कोरोनामुळे 24 तासांत एकही मृत्यू झालेला नाही. कर्नाटकातील कलबुर्गी येथील 76 वर्षीय व्यक्ती भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी ठरला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सध्या एकूण रुग्णांपैकी 0.03 टक्का सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.78 टक्के झाला आहे. कोरोना महामारीतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 41 लाख 17 हजार 611 (4,41,17,611) झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. तर, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.74 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -