घरताज्या घडामोडीगुडविन ज्वेलर्स प्रकरणातील मालकांना अटक

गुडविन ज्वेलर्स प्रकरणातील मालकांना अटक

Subscribe

न्यायालयात शरण आल्यानंतर ठाणे पोलिसांनी दोघा भावांना अटक केलं.

दीड महिन्यांपासून फरार असलेल्या गुडविनच्या मालकांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखाकडून करण्यात आली आहे. सोन्याच्या दुकांनाच्या माध्यमातून ठाणे, डोंबिवली, अंबनाथ शहरातील ११५४ गुंतवणूकदारांची २५ कोटींच्या रक्कमेची फसवणूक करून गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनिलकुमार आणि सुधिरकुमार मोहनन अकराकरण फरार झाले होते. या दोघां भावांना शुक्रवारी न्यायालयात शरण आल्यानंतर अटक केली आहे. विशेष न्यायालय आणि एमपीआयडी न्यायालयातून ठाणे पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलिसांकडून दिली आहे.

ऐन दिवाळीत सोन्याचे दागिने विकणारे गुडविन ज्वेलर्सचे शोरुम्स बंद झाले होते. या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ११५४ ग्राहकांकडून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तब्बल २५ कोटींची जादा रक्कम घेण्यात आली होती. मात्र ही परत न करतना या ज्वेलर्स मालकांनी २१ ऑक्टोबर पासून दुकाने बंद केली. ही ज्वेलर्सची दुकाने बंद झाल्यापासून गुडविनचा चेअरमन सुनिलकुमार अकराकरण आणि मॅनिजेंग डायरेक्टर सुधिरकुमार अकराकरण हे दोघे फरार झाले होत. यांच्याविरुद्ध तीन गुन्हे पोलीसात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीड महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेची पथक त्यांच्या मुळगावी केरळमध्ये तळ ठोकून होते. ‘बँकिंग अॅण्ड अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्कीम अॅक्ट २०१९’ या जुलै महिन्यात पारीत झालेल्या हा अॅक्ट या गुन्ह्यामध्ये लागू करण्यात आला आहे. या प्रकरणी डोंबवली, नौपाडा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०,४०६,३४,४०९ सह कलम ३ व ४ एमपीआयडी कायदा १९९९ च्या कलम ३,४,५,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरारी दोघा आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई ठाणे पोलिसांनी सुरू केली. यात त्यांची ९ बँक खाती सील करण्यात आली. तर २६ कोटींची स्थावर मालमत्ता यात पाच चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने गुडविन ज्वेलर्स दुकान मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि संचालक सुधिरकुमार मोहनन अकराकरण यांची नाकाबंदी झाली. अखेर दोघांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयात शरणागती पत्करली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात धोखाधडी आणि फसवणूक करीत गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि संचालक सुधिरकुमार मोहनन अकराकरण यांनी पोबारा केला. गुन्हे शाखेच्या पोईस पथकाने त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू केला. आरोपींच्या मूळगावी जि -त्रिधुर, केरळ येथे पोलीस पथक तळ ठोकून बसले होते. मात्र फरारी आरोपी हे सापडत नव्हते अखेर पोलिसांनी स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि आरोपींच्या वाहन चालकांच्या मदतीने दोघा आरोपींची स्थावर मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई केली. यात शोरूम, घर, बंगले, फार्म हाऊस, शेतजमीन, मर्सिडीज, फॉर्च्युनर, मॅच्युअल फंड, एलआयसी गुंतवणूक आणि शेअर्स आदी सील केली. पोबारा केलेल्या आरोपींना गुन्हे शाखेच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या कारवाईचा अखेर दोघे आरोपी दुकान मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि संचालक सुधीरकुमार मोहनन अकराकरण यांनी शुक्रवारी दुपारीच न्यायालयात शरणागती पत्करली आणि पोलीस पथकाने त्यांना अटक केली. त्यांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात फसविले ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधावा तसेच या दोन्ही आरोपींची कुठे मालमत्ता आढळल्यास त्याची माहिती आणि टाकणार आर्थिक गुन्हे शाखा आणि ठाणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – पालघरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -