Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गोवंडीत गोवरच्या विशेष लसीकरण मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद, जनजागृतीसाठी मौलवींची मदत

गोवंडीत गोवरच्या विशेष लसीकरण मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद, जनजागृतीसाठी मौलवींची मदत

Subscribe

गोवरच्या सर्व्हेमध्ये एफआर ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांचासुद्धा सर्व्हे करण्यात आला. या रुग्णांनासुद्धा २ लसीचे डोस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपाली मित्रा वाघमारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गोवरचे सर्वाधिक रुग्ण मुंबईजवळ असलेल्या गोवंडीमध्ये आढळत आहेत. यानंतर प्रमुख शहरातील दाटीवाटीच्या वस्तीमध्ये गोवरचे रुग्ण आढळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. गोवरचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका तसेच केंद्र सरकार संयुक्त प्रयत्न करत आहेत. बालकांना गोवरप्रतिबंधक लस देण्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. गोवरची लस घेण्यासाठी अल्पसंख्यांकांनी पुढे यावे यासाठी मौलवी, मंदिर आणि मस्जिदमध्ये जाऊन गोवरबाबत जनजागृती करण्यात आली होती. याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.

गोवंडीमध्ये गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत गोवंडी हा गोवरसाठी हॉटस्पॉट विभाग ठरत आहे. गोवर रोखण्यासाठी १० हेल्थपोस्ट तयार करण्यात आले आहेत. १ लाखपेक्षा जास्त घरांचे आशा सेविकांनी सर्व्हे केला. यामध्ये दीड हजार संशयित बालके आढळली आहेत. तर गोवर होण्याचे प्रमाण १ ते ५ या वयोगटामध्ये जास्त आहे. गोवंडीत बँगणवाडी, झाकीर हुसेन नगर, अण्णाभाऊ साठे नगर या भागात सर्वाधिक गोवरचे रुग्ण आढळले आहेत. ९ ते ५ वयोगटातील बालकांना अतिरिक्त एमआर डोस देण्यात येत आहेत. गोवरच्या सर्व्हेमध्ये एफआर ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांचासुद्धा सर्व्हे करण्यात आला. या रुग्णांनासुद्धा २ लसीचे डोस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपाली मित्रा वाघमारे यांनी दिली आहे.

विशेष लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद – डॉ. प्रिया कोळी

- Advertisement -

गोवंडीतील झाकीर हुसैन नगरमध्ये गोवरचा फैलाव होत आहे. दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे गोवर रोखणं आव्हानात्मक आहे. गोवरबाबत जनजागृती केल्यामुळे विशेष लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी २ वाजेपर्यंत ६० बालकांचे विशेष लसीकरण मोहिम अंतर्गत करण्यात आली असल्याची माहिती डॉ. प्रिया कोळी यांनी दिली आहे. लसीकरण केल्यानंतर कशाप्रकारे काळजी घ्यावी याची माहितीसुद्धा डॉक्टरांकडून लोकांना देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.


हेही वाचा : गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार; आरोग्यमंत्री सावंतांची माहिती

- Advertisement -
- Advertisement -
Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -