घरमुंबई"निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले"

“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले”

Subscribe

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच फितूरांना धडा शिकवा असे म्हणत निरंजन डावखरे यांना लक्ष्य केले आहे. निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डावखरे कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असून, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. नवी मुंबई येथे बोलत असताना पवारांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघड नसून सर्वांनी एकत्र येण्याची गरज देखील पवार बोलून दाखवली. शिवाय सत्तेचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे म्हणत पवारांनी भाजपाल देखील टोला हाणला. यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील निवडणूक आयोगाला ‘तवायफ’ म्हणून हिणलवं होते.

“फितूरांना धडा शिकवा”

“फितूरी काही आपल्यासाठी नवीन नाही. महाराजांच्या काळापासून ती आहे. पण, आपण फितुरांना धडा शिकवला पाहिजे” अशा शब्दात शरद पवार यांनी निरंजन डावखरेंना लक्ष्य केले. आमदारकीचा राजीनामा देत निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आता भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत. यावेळी आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला. आता तुम्ही आपले ‘डाव खरे’ ठरवा असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

- Advertisement -

“सत्ता आल्यावर माजू नका”

“तसेच सत्ता आल्यानंतर माजायचे नसते” अशा शब्दात शरद पवारांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला. सत्तेचा गैरवापर केला. पण, जनतेने हा दबाव झुगारून लावला. एकंदरीत सध्याचे वातावरण पाहता देशात सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचे देखील पवारांनी म्हटले

“पी. चिदंबरम यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने”

एअरसेल- मॅक्सीस प्रकरणात सध्या पी. चिदंबरम ईडीच्या रडारवर आहेत. नवी मुंबईतील भाषणात पवारांनी चिदंबरम यांच्या मुद्याला देखील हात घातला. पी. चिदंबरम यांच्यावर खटला भरून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पवार यांनी सरकारवर केला. त्यांनी केलेले कार्य सत्तेचा वापर करून दडपून टाकण्याचे प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचे देखील पवार यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

“राज्यात परिवर्तन नक्की घडेल”

देशासह महाराष्ट्र आता बदलत आहे. साम, दाम, दंड भेद वापराची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. प्रत्येकाला भाजपात प्रवेश दिला जात आहे. जो येणार नाही त्याच्या मागे ईडीची चौकशी लावून त्याला भाजपात नेले जात आहे. परिणामी आता भाजपात निष्ठावंताना दुर्बिण लावून शोधावे लागत असल्याचा टोला देखील पवार यांना भाजपला हाणला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -