घरCORONA UPDATEमुंबईत दोन दिवस सरकारी, पालिका लसीकरण केंद्र बंद

मुंबईत दोन दिवस सरकारी, पालिका लसीकरण केंद्र बंद

Subscribe

मुंबई : १५ मे रोजी रविवार असल्याने आणि १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रांवर १५ व १६ मे रोजी कोविड लसीकरण केंद्र बंद असणार आहे. मात्र, मंगळवारी १७ मे रोजी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

मुंबईत सध्या कोविडवर शासन व महापालिकेने चांगले नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच शासन व पालिकेने कोविडबाबत घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच, मास्क घालणे ऐच्छिक ठेवले आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालणे गरजेचे असल्याचे शासनाने व पालिकेने म्हटले आहे. मुंबईत लसीकरण चांगल्या प्रकारे झाल्याने कोविडचा संसर्ग कमी झाला आहे. मुंबईकरांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. आता बूस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी लसीचा डोस घेतला त्यांना कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते.

- Advertisement -

 


हेही वाचा :शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणारया तरुण नाशिक मधून ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -